NCP President Sharad Pawar while interacting with reporters at Hotel Emerald Park on Friday
NCP President Sharad Pawar while interacting with reporters at Hotel Emerald Park on Friday esakal
नाशिक

Sharad Pawar | कांदा उत्पादकांना राज्य सरकारने करावी मदत : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकसह नगर, सातारा, धुळे जिल्ह्यातील जिराईत शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी.

तसेच राज्य आणि केंद्र सरकारने बाजार समितीच्या आवारात कांद्याची खरेदी करत कुठल्याही बंधनाशिवाय कांद्याची निर्यात वाढवावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १०) येथे केंद्र व राज्य सरकारला दिला. (Sharad Pawar statement State government should help onion producers nashik news)

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आहे. मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चाच करत आहेत.

ही चर्चा थांबवून आता थेट शेतकऱ्यांना मदत करायला हवी, असे सांगून श्री. पवार म्हणाले, की कांद्याचा उत्पादन खर्च आणि विक्रीतून मिळणारे पैसे याचे गणित जुळत नसल्याने शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होत आहे.

मात्र ‘नाफेड’तर्फे खरेदी केली जात आहे, असे सरकारतर्फे सांगितले जात असले, तरीही प्रत्यक्षात बाजार समितीत कांद्याची खरेदी होत नसल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम बाजारपेठेतील भावावर झालेला दिसत नाही.

पारनेरच्या शेतकऱ्यांनी बाराशे रुपये क्विंटल भावाने कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी माझ्याकडे केली आहे. संसदेच्या अधिवेशनाचे सत्र सुरू होताच, कांदा उत्पादकांचा प्रश्‍न सरकारपुढे ठेवण्याचे मी ठरवले आहे.

याशिवाय अवकाळीने कोकणात आंब्याचे, नाशिकमध्ये द्राक्ष-कांद्याचे आणि गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची माहिती संकलित करण्यात येत असून, त्याआधारे आपण राज्य सरकारशी बोलणार आहोत.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

श्री. पवार नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कार्यक्रमांना जाण्यापूर्वी हॉटेल एमराल्ड पार्कमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, माजी आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याबद्दल प्रश्‍न विचारल्यावर श्री. पवार म्हणाले, की नागालँडचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला नव्हे, तर नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे.

नागालँडमध्ये सरकारमधून कोणताही पक्ष बाहेर नाही. तिथं नागांचे काही प्रश्‍न आहेत. यापूर्वी नागा संघटनांकडून देशविघातक कार्यक्रम राबविण्यात आला होता. ते टाळण्यासाठी ऐकण्याच्यादृष्टीने टाकलेले हे पाऊल आहे. आमच्या सात आमदारांनी नकारात्मक पातळीवर जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आम्ही कदापिही भाजपसोबत जाणार नाही.

जातीची विचारणा चुकीचे

सांगलीमध्ये खत विक्रीवेळी जातीच्या कॉलममध्ये माहिती भरावी लागते. यासंबंधाने पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. पवार यांनी जात का विचारली जात आहे? असा प्रश्‍न उपस्थित करत हे चुकीचे आहे, असे सांगितले.

तसेच इतिहासात अशी घटना पहिल्यांदा घडत असल्याचे सांगत श्री. पवार यांनी उपस्थितांकडे जातीची माहिती भरण्यासंबंधीचे काही कागद उपलब्ध आहेत काय? अशी विचारणा केली. त्यावर श्री. भुजबळ यांनी पॉस मशिनमध्ये माहिती भरल्याशिवाय काम होत नसल्याचे स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

SCROLL FOR NEXT