Amol Kolhe 
नाशिक

Sharad Pawar Yeola Rally: "शकुनी मामामुळं महाभारत घडलं"; कोल्हेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर छगन भुजबळांच्या येवल्यात आज शरद पवारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी कोल्हे बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

येवला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आज येवल्यात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख खासदार अमोल कोल्हे यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. राष्ट्रवादीत महाभारत घडवण्यास शकुनी मामा अर्थात फडणवीस कारणीभूत आहेत, असं नाव न घेता त्यांनी म्हटलं आहे. (Sharad Pawar Yeola Rally Mahabharata happened because of Shakuni Mama Kolhe attack on Fadnavis)

कोल्हे म्हणाले, "आज अनेक जण म्हणतात महाराष्ट्रात कुरुक्षेत्रासारखी परिस्थिती आहे. कुरुक्षेत्रात काय परिस्थिती होती. एकीकडं कौरव तर एकीकडं पांडव होते. पण हे महाभारत कोणामुळं घडलं? तर ते शकुनी मामामुळं घडलं. महाभारत घडण्यापूर्वी जेव्हा आक्रमण व्हायचं तेव्हा कौरव-पांडव एकत्र येऊन आक्रमण करत होते" (Latest Marathi News)

सभेतील उपस्थितांना सवाल विचारताना कोल्हे म्हणाले, "पण त्यांच्यात मिठाचा खडा टाकला तो शकुनी मामानं! हा शकुनी मामा कोण आहे? लोक मिठाचा खडा हा टरबुजासारखा किंवा कमळा सारखा आहे असं म्हणताहेत, मला तर दिसताना कमळाचं फूल दिसलं," असं कोल्हे म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

अशा पद्धतीनं वारंवार पक्ष फोडले जात आहेत, आमदार पळवले जात आहेत. हे का होतंय याचा विचार करायला हवा. केंद्रातील सरकारला सत्तेत येऊन ९ वर्षे झाली, त्यासाठी Modi @9, टिफीन बैठका असे कार्यक्रम सुरु झाले. पण इतक्या वर्षात महागाई कमी झाली का?, दर वर्षाला २ कोटी रोजगार मिळणार होते झाले का? शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव मिळणार होता झाला का? नाही झाली ना? ही सगळी पाप बघितल्यानंतर आता आपल्याला जनता आपली जागा दाखवणार याची भावना मनात बळावल्यानंतर मनातला शकुनी मामा जागा झाला आणि वेगळे फासे टाकायला लागला, अशा शब्दांत कोल्हेंनी जोरदार फटकेबाजी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT