Kalikamata nashik esakal
नाशिक

Shardiya Navratri 2022 : कालिकामातेच्या दर्शनास तोबा गर्दी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ग्रामदैवत श्री कालिकामातेच्या दर्शनासाठी रविवारी (ता. २) भाविकांची तोबा गर्दी उसळली होती. मंदिरापासून दूरवर दर्शन रांगा पोहोचल्या होत्या. राज्याचे गृहसचिव आनंद लिमये यांनी सहकुटुंब अभिषेक व महाआरती केली. दरम्यान, यात्रोत्सवानिमित्त गेल्या सात दिवसांत लाखो रुपययांची उलाढाल झाल्याने शहराच्या अर्थकारणासही काही प्रमाणात बुस्ट मिळाला.

ग्रामदैवत श्री कालिकामातेचा उत्सव मागील दोन वर्षे कोरोनामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे यंदा भाविकांत अलोट उत्साह आहे. यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात खेळणी व विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागले असून, त्याठिकाणीही मोठी गर्दी उसळली होती. गुरुवारी (ता. २९) व शुक्रवारी (ता. ३०) पावसाने यात्रोत्सवात काहीकाळ दाणादाण उडविली होती. मात्र, पावसाने शनिवार (ता. १)पासून उघडीप दिल्याने भाविकांनी वीक एन्डचा लाभ उठवत शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. (Shardiya Navratri 2022 Crowd to see Kalika Mata on kalikamata yatrootsav nashik news)

पेड दर्शनास पसंती

दरम्यान, रविवारच्या सुटीचा लाभ उठवत अनेकजण सहकुटुंब देवीच्या दर्शनास आल्याने गडकरी चौक, मुंबई नाका सर्कलपासूनच प्रचंड गर्दी उसळली होती. यामुळे सकाळपासूनच दर्शन रांगा दूरवर पोहोचल्या होत्या. त्यामुळे त्वरित दर्शन घेण्यासाठी अनेकांनी पेड दर्शनाचे पास मिळवत दर्शन घेणे पसंत केले.

पार्किंगवरून वादावादी

महापालिकेतर्फे यात्रोत्सवाकाळात वाहन तळासाठी महिला बचत गटांना पार्किंग शुल्क वसुलीचे ठेके दिले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी दुचाकीधारक व ठेकेदाराच्या माणसांत जोरदार वादावादी सुरू होती. तुमचा ठेका अधिकृत आहे का, यावरूनही अनेक दुचाकीधारक वाद घालताना दिसत होते. विषेश म्हणजे या वर्षी पार्किंगचे ठिकाण मंदिरापासून दूरवर दिल्याने अनेक वाहनधारकांत वाहन लावण्यावरूनच संभ्रम होता.

पायी जाणाऱ्या भाविकांत घट

साधारणपणे ८०-९० च्या दशकापर्यंत कालिकेच्या दर्शनासाठी घरापासून पायी जाणाऱ्या भाविकांची त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. भल्या पहाटे उठून देवीची गाणी म्हणत महिला मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनास जात असतं. विशेष म्हणजे सातपूर, सिडको भागातूनही महिला मोठ्या संख्येने पायीच दर्शनासाठी येत असे. कालौघात पायी, त्यात अनवाणी जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. आता पूर्वीसारखा निवांतपणा गेल्याने पायी जाण्यापेक्षा दुचाकीवर झटपट दर्शन घेऊन येण्यावर आजच्या तरुणाईचा कल दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT