Captain yogeshwar Kandalkar esakal
नाशिक

Shaurya Chakra: प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन कांडलकरांना ‘शौर्य चक्र' जाहीर

झारखंडमधील ३५ पर्यटकांची केली यशस्वी सुटका

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन योगेश्‍वर कृष्णराव कांडलकर यांना प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला आज ‘शौर्य चक्र' सन्मान जाहीर झाला आहे. गेल्यावर्षीच्या एप्रिलमध्ये झारखंडमधील देवघरच्या त्रिकुट पर्वतावरील रोप-वेमध्ये बिघाड झाला होता.

त्यावेळी हवेत अडकलेल्या ३५ पर्यटकांची यशस्वी सुटका करत त्यांचे प्राण वाचवले होते. त्यावेळी मोहिमेचे नेतृत्व श्री. कांडलकर यांनी केले होते. त्यानिमित्ताने त्यांना हा सन्मान जाहीर करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आनंदभाव व्यक्त केल्याचे हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी श्री. कांडलकरांना पत्राद्वारे कळवले. (Shaurya Chakra awarded to Air Force Group Captain yogeshwar Kandalkar on eve of Republic Day nashik news)

श्री. कांडलकर यांनी पर्यटकांची सुटका केली, त्यावेळी ते कोलकोत्ता येथील हेलिकॉप्टर युनिटचे कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. पर्यटकांची सुटका करण्यासाठी एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता.

देशातील तिसरे सर्वोच्च शांतताकालीन ‘शौर्य चक्र’ पदक मिळाल्याबद्दल कांडलकर कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. बंधू रूपेश कांडलकर म्हणाले, की वडील एच. ए. एल. मध्ये होते. त्यांनी विमानांच्या उत्पादनासाठी योगदान दिले. माझा बंधूने उड्डाणामधील यश पारंगत केले आहे.

पर्यटकांच्या सुटकेच्या मोहिमेबद्दल योगेश्‍वर कांडलकर म्हणाले, की हेलिकॉप्टरने हाती घेतलेल्या सर्वात धाडसी बचाव कार्यांपैकी एक होते.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

दीड हजार फूट उंचीवर लटकत असलेल्या ट्रॉलीतून लोकांना बाहेर काढण्यापूर्वी हेलिकॉप्टर हवेत पुरेसा वेळ फिरविणे, हे आमच्यासाठी कठीण काम होते. पण बचाव कार्य सुरु करण्यापूर्वी आम्ही प्रत्येक बाबींचा बारकाईने अभ्यास केला. अचूक नियोजनामुळे मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात आम्हाला मदत झाली.

योगेश्‍वर कांडलकर मूळचे नाशिककर

ग्रुप कॅप्टन योगेश्‍वर कांडलकर यांचा जन्म नाशिकमध्ये झाला आहे. त्यांचे शिक्षण ओझर टाऊनशिपमधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच. ए. एल. हायस्कूलमध्ये झाले. पुढे औरंगाबाद येथील सेवा प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण झाले. ते एक प्रतिष्ठित हेलिकॉप्टर पायलट आणि उड्डाण प्रशिक्षक आहेत. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT