Child Shivaji and Mata Jijau in a buggy in a palanquin procession taken out of Old Nashik. In the second photograph, a woman is admiring the youth dressed as Chhatrapati Shivaji Maharaj. esakal
नाशिक

Shiv Jayanti 2023 : शिवजन्मोत्सवाची शाही पालखी मिरवणुकीने वेधले लक्ष; जुने नाशिक परिसर भगवामय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जुन्या नाशिक परिसरातून १५८ मंडळांनी एकत्र येत शिवजन्मोत्सवा निमित्ताने भव्य शाही पालखी मिरवणूक काढत लक्ष वेधून घेतले. या शाही पालखीमध्ये सहभागी झालेले ढोलपथक, वारकरी, आदिवासी नृत्य यांच्यासह पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला-बालक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

तर, अश्‍वावर विराजमान झालेल्या शिवाजी महाराज आणि मावळ्यांसह जिजाऊ-बाल शिवाजी यांच्या बग्गीनेही उपस्थितांचे लक्ष वेधले. (Shiv Jayanti 2023 Royal palanquin procession of Shiv Janmotsava grabs attention Old Nashik news)

यंदा जुन्या नाशिकमध्ये प्रथमच शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य शाही मिरवणूक काढण्यात आली. या शाही पालखी मिरवणुकीला जुन्या नाशिकमधील शितला देवी मंदिरापासून प्रारंभ झाला.

प्रारंभी, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व हार अर्पण करण्यात आला. यानंतर पालखी मिरवणुकीला तुतारीच्या निनादात प्रारंभ झाला.

नानावली, शिवाजी चौक, आझाद चौक, चव्हाटा, छपरी तालीम, शिरीषकुमार चौक, पाटील गल्ली, गजराज चौक, सुभाष वाचनालय येथून पुन्हा त्याच मार्गाने पालखी मिरवणूक जात शितला देवी मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात समारोप करण्यात आला.

या पालखी मिरवणुकीमध्ये शिवनाद ढोलपथक, शिवतांडव ढोलपथक सहभागी झाले होते. तसेच, त्र्यंबकेश्‍वर येथील सुमारे १२० वारकरी टाळमृदंगाचा गजर लक्ष वेधत होते. त्याचप्रमाणे, या मिरवणुकीमध्ये वासुदेव, पोतराज, आदिवासी नृत्यपथकही सहभागी झालेले होते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

तर, पालखी मिरवणुकीमध्ये अश्‍वावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या समवेत मावळ्याचा जिवंत देखावा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच, बग्गीमध्ये माता जिजाऊ व बाल शिवाजी हेही आकर्षण ठरत होते.

जागोजागी पालखीचे औक्षण करून स्वागत केले जात होते. पालखी मिरवणुकीचा मार्ग भगव्या पताका आणि झेंड्यांनी भगवामय झालेला होता. या मिरवणुकीमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेत जागोजागी शिवरायांचा जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता.

डीजे, गुलालाला फाटा

या पालखी मिरवणुकीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे, पारंपारिक वाद्य वगळता कोणत्याही वाद्यांचा वापर करण्यात आला नव्हता. डीजे न वापरता त्याऐवजी ढोलपथकांचा समावेश करण्यात आलेला होता. तसेच, कुठेही गुलाल उधळण्यात आला नाही. पुरुष-महिलांनी भगवे फेटे व पारंपारिक वस्त्र परिधान केल्याने वेगळेच वातावरण तयार झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

Pune News : आयफोन विमा दावा नाकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय; ८९ हजार परत करण्याचे आदेश

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

SCROLL FOR NEXT