Eknath Shinde esakal
नाशिक

Nashik : एकनाथ शिदेंच्या बंडाने सेना पदाधिकाऱ्यांची कोंडी

विक्रांत मते

नाशिक : राज्याचे नगरविकास मंत्री व विधानसभेतील शिवसेनेचे (Shiv Sena) गटनेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नॉट रिचेबल राजकारणाचे पडसाद नाशिक शहर व जिल्ह्यात उमटताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नंतर प्रतोद संजय राऊत (Sanjay Raut) व एकनाथ शिंदे या दोघांचा नाशिकशी संबंध असल्याने उघड-उघड दोन गट पडल्याने अनेकांची कोंडी झाली परंतु यापूर्वी नाशिकचे संपर्क प्रमुख राहिलेल्या अजय चौधरी यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने नाशिकमध्ये सेनेचे डॅमेज कन्ट्रोल झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेकांनी आता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतल्याचे तूर्त बोलले जात असले तरी वेट ॲण्ड वॉच भूमिका परवडणारी असल्याचे अनेक जण मानत आहेत. (Shiv Sena leader confused due to Eknath Shindes rebellion maharashtra political news)

मुंबई, ठाणे नंतर नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात आहे. सेनेच्या बालेकिल्ल्याला मध्यंतरीच्या काळात भगदाड पडले असले तरी शिवसेनेची ताकद शहर व ग्रामिण भागात कमी-अधिक प्रमाणात राहीली आहे. जिल्हा परिषदेची सत्ता तसेच महापालिकेतही विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेची ताकद कायम आहे. शहर व जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी सेनेच्या दोन प्रमुख नेत्यांचा संबंध कायम राहिला आहे. प्रतोद संजय राऊत व एकनाथ शिंदे हे दोघे नाशिकमधील सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळचे राहिले. एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारल्यानंतर मात्र राऊत की शिंदे या संभ्रमात काही पदाधिकारी पडले आहेत. खुलेपणाने बोलत नसले तरी संभ्रमावस्था असल्याचे खासगीत बोलले जात आहे. परंतु जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत स्पष्ट भूमिका घेणे टाळले जाणार असल्याची चर्चा आहे.

महापलिका निवडणुकीची धास्ती

आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळून महापालिकेत सत्तेवर येईल असा विश्‍वास आहे. परंतु आता सेनेत बंडाळी निर्माण झाल्याने त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होण्याची धास्ती निर्माण झाली आहे. सेनेतील डॅमेज कन्ट्रोल होण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT