Eknath Shinde esakal
नाशिक

निवडणूक तयारी सोडून शिंदे मागे कोण जाणार?

शिवसेनेच्या इच्छुकांना त्यांच्या राजकीय करिअरची चिंता आहे.

विनोद बेदरकर

नाशिक : शहर- जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची धामधूम आहे. प्रभाग आणि गट गणात शिवसेनेच्या इच्छुकांना त्यांच्या राजकीय करिअरची चिंता आहे. अशा स्थितीत शिंदे सोबत जाऊन काय होईल? आमचे राजकीय भवितव्य डावावर लावून फुटणार कोण? असा शिवसेनेतील इच्छुक व कार्यकर्त्यांमधून एकमेकांच्या संवादात प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्याने भलेही राज्यातील सत्ताकारणावर परिणाम झाला असला तरी, नाशिक शहर जिल्ह्यात मात्र फारसा परिणाम होणार नाही. शहर परिसरात तर काहीच परिणाम दिसत नाही. किंबहुना तसा तो दिसणारही नाही. असाच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे.

नाशिकला शिवसेनेचे मोठे संघटन आहे. शहर जिल्ह्यातील दोन पिढ्या शिवसेनेत वाढल्या आहेत. मुंबई सोबत नाशिकच्या भगूरला शिवसेनेची शाखा सुरू झाली एवढा जुना इतिहास आहे. मुंबईनंतर नाशिक शिवसेनेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. अशा बंडातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची आर्थिक सोय होते. त्यांचे राजकीय भवितव्याचा फैसला होतो. सामान्य कार्यकर्त्याच्या हाती काही लागत नाही. हाच आत्तापर्यंतचा अनुभव असल्याने बंडाचा परिणाम होणार नसल्याचे शिवसेनेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

भुजबळांपासून श्रीगणेशा

नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना बंडाळीचा अनुभव नवा नाही. किंबहुना सर्वप्रथम पहिल्या वाहिल्या बंडाचा फटका नाशिकला बसला. सध्याचे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बंड केले तेव्हा शहरातील पदाधिकारी शिवसेनेतून फुटले. तत्कालीन एक आमदार त्यांच्यासोबत असल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्या विरोधात रेल्वे स्थानकावर बंडाळी विरोधात शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली. आक्रोश एवढा मोठा होता की, श्री भुजबळ यांच्या सोबत जाऊ इच्छिणाऱ्या कुंपणावरील अनेकजण शिवसेनेत राहिले.

राज ठाकरेंचा ‘मनसे’ दणका

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना सोडल्यानंतर मुंबई नाका भागातील वसंत गिते यांच्यासह एक गट मोठ्या जोशात त्यांच्यासोबत गेला. त्याचा सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसला. महापालिकेतील सत्ताही मनसेने मिळविली. तेव्हाही शिवसेना संपली असे अनेकांनी भाकीत केली गेली. मात्र, आज राज ठाकरे यांच्यासोबत बंडाच निशाण फडकवलेले माजी आमदार वसंत गिते यांच्यासह त्यांचे पुत्र आणि इतर अनेक समर्थक आज शिवसेनेतच आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेत असताना त्यांनी बंड केले. तत्पूर्वी राणे यांनीही जिल्ह्यातील सिन्नर, चांदवडसह जिल्ह्यातील इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना विधानसभेसाठी रसद पुरवीत शिवसेनेत प्रस्थापित करण्यात मोठी ताकद खर्ची पाडली होती. मात्र कालांतराने त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार दस्तुरखुद्द राणे यांच्यासोबतही राहिले नाहीत.

...फक्त राजकीय सोय

बंड म्हणजे तत्कालीन राजकीय सोय एवढाच अर्थ लावला जातो. त्यामुळे शिंदे यांच्या बंडाचा नाशिकमध्ये परिणाम होणार नाही. त्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लागल्या असल्याने तरुण पदाधिकाऱ्यांना स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. उमेदवारीपासून अनेक विषय शिवसेनेशी निगडित असल्याने अशा स्थितीत स्वतः:चे राजकीय भवितव्य डावावर लावून स्थानिक पातळीवर कुणी शिंदे यांच्यासोबत जाण्याची सुतराम शक्यता नसल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT