MP Sanjay Raut, Shiv Sena leader Subhash Desai, Vinayak Raut, Arvind Sawant, Varun Sardesai etc. while inspecting Hotel Democracy, the venue of the Shiv Sena convention to be held in January. esakal
नाशिक

Nashik Shivsena News: शिवसेनेच्या बैठकीत अधिवेशनाचे नियोजन; एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांची चर्चा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारीला सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकमध्ये येत्या २२, २३ जानेवारीला शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यस्तरीय खुले महाअधिवेशन होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारीला सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.

या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल एक्स्प्रेस इन येथे रविवारी (ता.२४) झाली. पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकरोडवरील महाशिबिर होणाऱ्या हॉटेल डेमाक्रॅसीचीही पाहणी केली. (Shiv Sena meeting planning convention Discussion of office bearers at Express Inn Hotel Nashik News)

जानेवारीत होऊ घातलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महाशिबिर व खुल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे शनिवारी रात्री (ता.२३) नाशिकमध्ये दाखल झाले होते.

या अधिवेशनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभाही होणार आहे. तर, हॉटेल डेमाक्रॅसी येथे महाशिबिर होणार आहे.

पूर्वनियोजनासाठी हॉटेल एक्स्प्रेस इन येथे रविवारी (ता.२४) शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, सचिव सूरज चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.

नियोजनाबाबत सूचना करतानाच, मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकरोडवरील हॉटेल डेमाक्रॅसी येथे भेट देत पाहणी केली. याठिकाणी पक्षाचे महाशिबिर होणार आहे.

उपनेते सुनील बागूल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नितीन आहेर, गणेश धात्रक, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विनायक पांडे, योगेश घोलप, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, देवानंद बिरारी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT