shivsena meet esakal
नाशिक

Nashik : मुस्लिम युवकांच्या हाती शिवसेनेचा भगवा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील अनेक मुस्लिम युवक शिवसेनेत प्रवेश करीत आहे. नाशिक रोड व अशोका मार्ग परिसरातील मुस्लिम समाजातील अनेक तरुणांनी शिवबंधन बांधून घेत शिवसेनेचा भगवा हातात घेतला. (Shiv Sena saffron flag in hands of Muslim youth Nashik Latest Marathi News)

शालिमार कार्यालयात नुकताच मुस्लिम युवकांच्या प्रवेश सोहळा झाला. शिवसेनेचे उपनेते बबन घोलप, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महिला आघाडी जिल्हा संघटक शोभा मगर आदीच्या उपस्थितीत उस्मान खान, अजीज शेख, विक्की वाघ, मुजाहिद शेख, मोईन शेख, शोएब शेख, अरबाज शेख, फरहान सय्यद, अयाझ शेख, सलमान शेख, शेहबाज शेख, तारीफ मेमन यांच्यासह अनेक मुस्लिम तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.

नीलेश गांगुर्डे, महेश बडवे, सुभाष गायधनी, मंगला भास्कर, शोभा गटकळ, रमेश उघडे, नीलेश साळुंखे, सुयश पाटील, स्वाती पाटील, फैमिदा रंगरेज, द्वारका गोसावी, शोभा दिवे, श्रध्दा कोतवाल, कीर्ती जवखेडकर, उषा गायखे, मिलिंद देशमुख, शिवाजी दाते, आशिष शिंदे, हर्षल गांगुर्डे, संपत वाघ, प्रकाश वाघ, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.

"शिवसेना सर्व जाती- धर्माचा आदर बाळगते. समाजातील सर्व घटकांचा विकास हाच या पक्षाचा ध्यास असल्याने या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शिवसेनेचे विचार पटत असल्याने मुस्लिम समाजातील युवक मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश करीत असल्‍याने आगामी निवडणुकीत शिवसेनेचीच सत्ता येईल." - बबन घोलप, शिवसेना उपनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

निवृत्त बॅंक अधिकारी ६० लाखाला फसला! दागिने विकले, नातेवाइकांकडूनही पैसे घेतले, सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडले; आभाशी २ कोटी दिसले,‌ त्याचा टॅक्सही भरला, पण...

Nitin Gadkari: ''हत्येपूर्वी काही तास हमास प्रमुखांना भेटलो'', नितीन गडकरींनी सांगितला घटनाक्रम

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप आमदार उद्या मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार

IPL २०२६ आधी आरसीबीच्या स्टार खेळाडूला मोठा धक्का! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, तुरूंगात रवानगी होणार?

SCROLL FOR NEXT