Aditya Thackeray shiv sanwad yatra  Sakal
नाशिक

"बाळासाहेबांनी आणि आजीने शिकवलंय की कुणाचं वाईट..." - आदित्य ठाकरे

बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे, काय म्हणाले वाचा

सकाळ डिजिटल टीम

मनमाड : शिवसेनेची शिवसंवाद यात्रा सुरू असून आदित्य ठाकरे यांनी आज मनमाडमध्ये मेळावा घेतला आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेत सडेतोड उत्तर देण्यासाठी ही यात्रा सुरू केली आहे. बंडखोरांनी गद्दारी का केली हे कळलं नाही असं म्हणत त्यांनी मनमाडमध्ये बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

(Aditya Thackeray On MLA)

"मी आज त्यांच्यावर आरोप करायला आलोच नाही कारण उद्धव साहेब आणि बाळासाहेबांनी हेच शिकवलंय की, आदित्य चांगलं काम करत रहायचं, कुणाचं वाईट चिंतायचं नाही आणि हीच आपली शिवसेना आहे. पण सध्याचे सरकार हे तात्पुरतं आहे, तुम्ही लिहून घ्या की हे सरकार कोसळणारंच." असं टीकास्त्र आदित्य ठाकरेंनी सोडलं आहे.

"बंडखोरी केलेल्या या ४० लोकांच्या चेहऱ्यावर मला कधीच आनंद दिसला नाही. ते कधीच नजरेला नजर भिडू शकले नाहीत पण माझ्या चेहऱ्यावर आज जो आनंद आहे तोच त्यावेळीही होता कारण मी त्यांच्यासारखा विकलो गेलो नाही." असा टोला त्यांनी लावला आहे. "बंडखोरी सोडा, लोकांची सेवा करत राहा, काम करत राहा लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. पण तुम्ही लोकांना खोटं बोलत राहिलात, फसवत राहिलात तर तुम्हाला लोकं गाडून टाकतील कारण ही लोकशाही आहे." असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेनेनी त्यांना काय कमी केलं होतं? त्यांना जे पाहिजे होतं ते दिलं, त्यांना निधी दिला मग आमचं काय चुकलं? असा सवाल ठाकरेंनी केला आहे. "या ठिकाणी मी जाहीर माफी मागून सांगतो की, आमचं एक चुकलं की, आम्ही राजकारण केलं नाही, आमच्या आमदारांवर लक्ष ठेवलं नाही हे आमचं चुकलं. आम्ही राजकारण सोडून लोकांची सेवा करत आलो आणि त्यांनी अशी गद्दारी केली." अशी खंत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली.

"उद्धवसाहेबांच्या सर्जरीवेळी मला स्कॉटलंडला जायचं होतं तरी, त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझा विचार करू नको, तुला महाराष्ट्राचं नाव पुढे न्यायचं आहे." असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर बंडखोर आमदार सुहास कांदे हे ठाकरे यांना मनमाड येथे भेटणार होते पण त्यांनी भेटण्यासाठी मातोश्रीवर यावं असा सल्ला आदित्य ठाकरेंनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT