shivsena BJP esakal
नाशिक

विकासकामे न झाल्यास शिवसेनेतही भीती

विक्रांत मते

नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी विकासकामे न झाल्यास मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती भाजप पाठोपाठ शिवसेनेलादेखील असल्याने त्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना पत्र लिहून महासभेने संमत केलेले अंदाजपत्रकाचा ठराव तातडीने देण्याची मागणी केली. (shivsena-fears-facing-voters-anger-in-nmc-election-nashik-political-news)

भाजपसह विरोधी पक्षांमध्ये खदखद

३१ मार्चपूर्वी अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत नमुद करण्यात आलेली कामे पूर्णत्वास न्यावी लागतात. परंतु, यावर्षी मे महिन्यात अंदाजपत्रकीय सभा झाल्याने दोन महिने अंदाजपत्रक लांबणीवर पडले. त्यात आता महापौरांकडून अद्यापही नगरसचिव विभागाला ठराव प्राप्त न झाल्याने सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांमध्ये खदखद वाढली आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी सत्ताधारी भाजपला घरचा आहेर दिल्यानंतर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौरांना पत्र लिहून खदखद व्यक्त केली. महासभेचे अंदाजपत्रक ३१ मार्चपूर्वी मंजूर होणे आवश्‍यक होते, परंतु तब्बल दोन महिन्यानंतर मंजुरी मिळाली. मंजुरी मिळून पंधरा दिवस उलटले तरी अद्यापही प्रशासनाला ठराव प्राप्त झाला नाही. त्यामुळे सदस्यांनी सुचविलेल्या कामांचा समावेश होईल की नाही, अशी भीती पत्रात व्यक्त करण्यात आली.

...तर जनतेची नाराजी

पुढील वर्षी फेब्रुवारीत महापालिकेच्या निवडणुका होत असून, नगरसेवकांना प्रभागांमध्ये जास्तीत-जास्त विकासकामे करावी लागणार आहे. महासभेच्या अंदाजपत्रकानुसार विकासकामे न झाल्यास नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. त्याचा फटका सर्वच पक्षांना बसेल. त्याअनुषंगाने अधिकाधिक विकासकामे होण्यासाठी अंदाजपत्रकाला तत्काळ मंजुरी द्यावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

''प्रशासकीय अंदाजपत्रकानुसार कामे झाल्यास महासभेने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाला अर्थ उरणार नाही. त्यामुळे महासभेतील चर्चा व निर्णय ‘बोलाची कढी व बोलाचाच’ भात होईल.'' -अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापालिका.

(shivsena-fears-facing-voters-anger-in-nmc-election-nashik-political-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT