shivsena mp sanjay raut close aide nashik bhausaheb chaudhari expulsion from thackeray faction  Esakal
नाशिक

Maharashtra Politics : ठाकरे गटाला पुन्हा हादरा! संजय राऊतांच्या जामीनदाराचीच हकालपट्टी

सकाळ डिजिटल टीम

नाशिकमधील खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्कप्रमुख असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून उचलबांगडी केल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट कली आहे. विशेष म्हणजे संजय राऊतांच्या जामीनावर चौधरी यांनी स्वाक्षरी केली होती. दरम्यान आता भाऊसाहेब चौधरी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

"शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे." असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला यापूर्वी देखील धक्के बसले आहेत. काही दिवसांपूर्वी १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर नाशिकच्या संपर्कप्रमुख जबाबदारी भाऊसाहेब चौधरी यांच्या कडे होती. तसेच चौधरी हे संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT