Performers dancing to the song in the Weekly market esakal
नाशिक

Song Shooting : ‘चल चल जाऊ बाजाराला’ गाण्याचे जोगमोडीत चित्रिकरण; स्थानिक कलाकारांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

म्हसगण (जि. नाशिक) : जोगमोडी येथील आठवडे बाजारात रवी पवार लिखित दिग्दर्शित ‘चल चल जाऊ बाजाराला’ या गाण्याचे चित्रीकरण पाहण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली. (shooting of song Chal Chal Jau Bazarala at Jogamodi Participation of local artists nashik news)

ग्रामीण भागातील लोकांनी चित्रीकरण जवळून पाहिले नसल्याने शूटिंग हा त्यांच्या कुतूहलाचा विषय बनला. रवी पवार हा तरुण शॉर्ट फिल्म, गाण्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषय समाजासमोर मांडत असतो.

त्याच्या ‘नाऱ्या’ या लघुपटाला महर्षी फिल्म फेस्टीवलमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. ‘चल चल जाऊ बाजाराला’ या गाण्यामध्ये त्यांनी स्थानिक कलाकारांना संधी देवून ग्रामीण भागात हरणगाव, जोगमोडी येथे चित्रीकरण केले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

यात स्पेशल ॲक्टर, लीड ॲक्टर, सबॲक्टर, सुपर डांन्सर हे स्थानिक कलाकार आहेत. बाल कलाकार म्हणून शरण्या मोरे व शर्वरी कंक यांनी काम केले आहे. गिताचे लेखन व दिग्दर्शन रवी पवार यांचे असून, त्यांच्यासह ललित गावित यांची निर्मिती आहे.

सहदिग्दर्शक म्हणून नितीन चव्हाण, संदीप धूम, डी.ओ.पी. म्हणून दिलीप गांगोडे यांनी काम पाहिले. गणेश जाधव, विजय भरसट, मंगल बच्छाव, सारिका गांगोडे यांच्यासह हरणगाव, शिंदे येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT