Corona Vaccination News esakal
नाशिक

Nashik Vaccine Shortage : जिल्ह्यात लशींचा तुटवडा; कोरोनाचे संकट घोंघावतय!

सकाळ वृत्तसेवा

Nashik Vaccine Shortage : कोरोनाचे (Corona)संकट पुन्हा घोंघावत असताना (Nashik News) जिल्ह्यात मात्र लशींचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. (shortage of covishield vaccine in district nashik news)

काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोव्हिशील्डच्या लशी संपल्या असून, नागरिकांना लसीकरण केंद्रावरून माघारी फिरावे लागत आहे. जिल्हा परिषद व आरोग्य विभागाने ५ एप्रिलला कोव्हिशील्डचे ५० हजार, कोव्हॅक्सिन २५ हजार, तर कोरबिव्हॅक्सच्या १५ हजार लशींची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. पुढील आठवड्यात लशींचा पुरवठा होण्याची शक्यता आहे.

देशात एकाचवेळी सहा हजार कोरोनाचे रुग्ण आढळले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यासह जिल्ह्यातही रोजच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्कतेचे आवाहन केले आहे. कोरोनाचे संकट दारात उभे असताना नाशिक जिल्ह्यात मात्र लशींचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिलासा मिळाला. त्यामुळे लसीकरणात घट झाली होती. मात्र, काही दिवसांपासून कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी याबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचनादेखील केल्या असून, राज्यांना व राज्याने प्रत्येक जिल्ह्याला मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. मास्क सक्तीबाबत राज्य शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

कोरोना वाढल्याने लस घेण्यासाठी नागरिक केंद्रांवर जात आहेत, मात्र जिल्ह्यात कोव्हिशील्ड लशींचा खडखडाट आहे. तर काही केंद्रांवर कोव्हॅक्सिन उपलब्ध नाहीत. आरोग्य विभागाने कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. लशींचा तुटवडा असल्याने शासनाकडे लशींची मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली.

बूस्टर डोसचे प्रमाण नगण्य

आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ५१ लाख ५६ हजार १०३ नागरिकांनी लशीचा पहिला, तर ४५ लाख ८२ हजार २०० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. बूस्टर डोसचे प्रमाण मात्र नगण्य असून, पाच लाख ५० हजार १३६ नागरिकांनीच हा डोस घेतला आहे. कोव्हिशील्डचा पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस याच लशीचा घ्यावा लागणार आहे, मात्र सध्या ही लस उपलब्ध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT