agitation  esakal
नाशिक

Nashik: विविध मागण्यांसाठी श्रमिक सेनेचे मंगळवारी आंदोलन; रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक सेवा राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, तसेच ट्रक चालकांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता.१२) श्रमिक चालक-मालक सेनेतर्फे प्रलंबित व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक सेनेचे महानगरप्रमुख मामासाहेब राजवाडे यांनी दिली आहे.

आंदोलन दरम्यान सकाळी ११ ते ५ या वेळेत रिक्षा, टॅक्सी सेवा बंद करणार आहेत. (Shramik Sena protests on Tuesday for various demands Rickshaw taxi tempo truck services will remain closed Nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्रमिक सेनेतर्फे रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक-मालक यांनी विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले होते. मात्र, त्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. परिणामी चालक आणि मालक भरडला जात आहेत.

परंतु शासन मात्र उदासीन आहे. परिणामी प्रलंबित व इतर विविध मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सकाळी ११ ते ५ यावेळेत श्रमिक सेना संस्थापक सुनील बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्याध्यक्ष भगवान पाठक, जिल्हाध्यक्ष अजय बागूल, मामासाहेब राजवाडे, शंकर बागूल, नवाज सय्यद, राजेंद्र वागले यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सर्व रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक-मालक आंदोलन करणार आहेत.

"रिक्षा टॅक्सी चालक-मालकांच्या विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले होते. परंतु, शासनाने त्याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. अखेर मंगळवारी सायंकाळपर्यंत रिक्षा , टॅक्सी, टेम्पो सेवा बंद ठेऊन आंदोलन करण्यात येणार आहे"

- मामासाहेब राजवाडे, महानगरप्रमुख, श्रमिक सेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT