trimbakeshwar temple latest marathi news esakal
नाशिक

Shravan 2022 : त्र्यंबकला असेल कडेकोट पोलिस बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : श्रावणमासात त्र्यंबकेश्‍वर येथे त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. तर, येत्या तिसऱ्या श्रावण सोमवारी (ता.१५) ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठीही भाविक लाखोंच्या संख्येने येतात. या पार्श्‍वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. (Shravan Somvar 2022 Trimbak will have tight police presence nashik Latest Marathi News)

बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग म्हणून त्र्यंबकेश्‍वराची ख्याती आहे. त्यामुळे श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची गर्दी होते. परंतु त्यातही तिसऱ्या सोमवारी भाविकांची गर्दी लाखोंच्या संख्येने असते.

त्याचवेळी भाविक सुमारे मैलांची ब्रह्मगिरी प्रदक्षिणाही घालतात. या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्र्यंबकेश्‍वर शहरात भाविकांच्या वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता असते.

त्यामुळे यावेळीही खासगी वाहनांना त्र्यंबकेश्‍वर शहरात प्रवेश बंदी केली आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे व ३५० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. खासगी वाहनांना पहिणेपर्यंतच प्रवेश दिला जाण्याची शक्‍यता आहे तर, जव्हार फाट्यापर्यंत सिटीलिंक व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जातील.

"तिसऱ्या श्रावण सोमवारी लाखो भाविक येण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. खासगी वाहनांना त्र्यंबकेश्‍वर शहरात प्रवेशबंदी राहील. त्यामुळे भाविकांनी बसेसचा वापर करावा." - सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

Indurikar Maharaj daughter engagement : निवृत्ती महाराज इंदुरीकरांकडून लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च? ; डबेवाला संघटना अध्यक्षांची जोरदार टीका, म्हणाले...

Sand Mafia Caught : महसूल विभागाचा वाळू माफीयांना दणका : संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी उडवल्या!

'लागली पैज?' नाटक येतंय प्रेक्षकांच्या भेटीला; 'शुभविवाह' फेम अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका; रुमानी खरेचं रंगभूमीवर पदार्पण

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

SCROLL FOR NEXT