Trambakeshwar temple latest marathi news esakal
नाशिक

श्रावणसरींनी दिलेल्या उघडीपमधील ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेत अमाप उत्साह

प्रतीक जोशी

त्र्यंबकेश्र्वर (जि. नाशिक) : श्रावणसरींनी आजच्या श्रावणातील दुसऱ्या सोमवारी उघडीप दिली होती. मात्र आजवरच्या पावसामुळे हिरव्याकंच निर्सगराजीने ब्रह्मगिरी पर्वत सजला आहे. अशा हर्षोल्हासाच्या वातावरणात भाविकांमध्ये ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा अमाप उत्साह होता. प्रदक्षिणेत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मुखी ‘बम-बम भोले‘चा जयघोष होता. (Shravan somvar bramhagiri feri nashik Latest Marathi news)

Bramhagiri mountain

त्र्यंबकेश्‍वरमधील ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी उसळत असते. पण अलिकडच्या काळात श्रावणातील प्रत्येक सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्याकडे भाविकांचा कल वाढत चालला आहे.

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी पहाटेपासून भाविक कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी येत होते. स्नान झाल्यावर लागलीच प्रदक्षिणा मार्गावर रवाना होत असत. वाटेत प्रयाग तीर्थाचे दर्शन घेवून पुढे गौतम ऋषींनी तपश्‍चर्या केल्याची अख्यायिका असलेल्या गौतम धस पर्वताकडे भाविकांची पावले वळाली. गौतम धस पर्वत चढून तेथे गौतम ऋषींच्या मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले अन् पर्वत उतरले.

श्रावण सोमवारनिमीत्त टाळ-मृदुंगाच्या गजरात ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करताना भाविक-भक्त.

भाविक टाळ-मृदुंगाच्या गजरात भोलेनाथाचा जयघोष करत होते. तरुण-अबालवृद्ध, शाळकरी मुलांची संख्या प्रदक्षिणा करणाऱ्यांमध्ये मोठी होती. अनेक जण कुटुंबियांसह प्रदक्षिणा करत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

काही भाविकांनी आपण पस्तीस वर्षांपासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असल्याचे सांगितले. प्रदक्षिणा झाल्यावर ज्योतिर्लिंग आणि आजच्या एकादशीनिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले.

श्रावण फेरीचे महत्व

श्रावण मास हा शंभू महादेवाच्या उपासनेसाठी पवित्र मानला जातो. शंभूभक्त महादेवांच्या भक्तीत तल्लीन होतात. ब्रह्मगिरी पर्वाताच्या प्रदक्षिणाबद्दल पुराणात नोंद आहे. त्र्यंबकेश्र्वराच्या आरतीमध्ये सुद्धा त्याचे महत्व विशद केले आहे.

श्रावणातील शिवरुपी काळ

ब्रह्मगिरींची भावे ज्याला प्रदक्षिणा जरी घडे हो।
तैं ते काया कष्टें जंव जंव चरणी रुपती खडे हो।।
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्याचें झडे हो।
केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पाया पडे हो।।

आरतीतील या ओळीनुसार आयुष्यात एकदातरी ब्रह्मगिरीची प्रदक्षणा घडावी. ही प्रदक्षिणा पूर्ण करताना वाटेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातूनही मिळणारा उत्साह आणि आनंद जीवनात चिंता ठेवत नाही. श्रावणातील प्रत्येक सोमवार हा शिवरुपी काळ आहे, असे त्र्यंबकेश्‍वरमधील पुरोहित ललित लोहगांवकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT