Devotees esakal
नाशिक

Shravan Somvar: कपालेश्‍वरी दर्शनास पहाटेपासून गर्दी! यात्रोत्सव फुलला

सकाळ वृत्तसेवा

Shravan Somvar : दुसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत प्राचीन कपालेश्‍वर महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी होती. पोलिसांनी रामतीर्थाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेटिंगद्वारे बंदीस्त केल्याने वाहतूक कोंडीसही आळा बसला.

सायंकाळी पालखी सोहळ्यास मोठी गर्दी उसळली होती. निसर्गाच्या सानिध्यातील सोमेश्‍वर महादेवाच्या दर्शनासाठीही दिवसभर रांगा लागल्या होत्या. दरम्यान, श्रावणामुळे बेलाच्या पानांसह अन्य फुलांच्या मागणीतही मोठी वाढ झाल्याने फुलांचे अर्थकारणही तेजीत आहे. (Shravan Somvar Crowded since dawn for Kapaleshwari Darshan Yatrotsava flourished nashik)

कपालेश्वर मंदिरात अकराशे कमळपुष व ५ हजार मोसंबी, डाळिंब आणि केळी फलार्चन करताना महामंडलेश्वर संविदानंद सरस्वती

श्रावणातील दुसरा सोमवार व प्रदोषचे औचित्य साधत पंचवटीतील कपालेश्‍वर महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची दिवसभर गर्दी होती. पोलिसांनी रामतीर्थाकडे जाणारे रस्ते बॅरीकेटिंगद्वारे बंदीस्त केल्याने येथील वाहतूक कोंडीही टळली.

पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा करण्यात आल्या होत्या. याशिवाय सकाळी स्थानिक नागरिक, ज्येष्ठ व विकलांग भाविकांसाठी मागील दाराने दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.

कपालेश्‍वराप्रमाणेच संत जनार्दन स्वामी आश्रमातील शर्वायेश्‍वर महादेव मंदिर, निळकंठेश्‍वर, नारोशंकर, श्री मुक्तेश्‍वर, तीळभांडेश्‍वरासह शहरातील लहान मोठ्या शिवालयात मोठी गर्दी उसळली होती.

शहरापासून जवळच असलेल्या श्री सोमेश्‍वर महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासून उसळलेली गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. देवस्थानातर्फे पहाटे श्री महादेवाला अभिषेक करण्यात आला.

याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, विश्‍वस्त हरीश शिंदे, ॲड. संदीप गायकर, अमोल वाजे यांच्यासह सर्व विश्‍वस्त उपस्थित होते. मंदिरावर विद्युतमाळांसह फुलांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांना खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले. देवस्थानतर्फे आयोजित रक्तदान शिबिरालाही मोठा प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कपालेश्‍वरी अकराशे कमलपुष्प अर्पण

पेठ रोडवरील कैलास मठ ट्रस्टतर्फे विश्‍वकल्याणार्थ श्री कपालेश्‍वर महादेवास पाच हजार मोसंबीसह अकराशे कमलपुष्पांनी अभिषेक करण्यात आला.

याप्रसंगी आचार्य महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वती, पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्टचे महंत भक्तीचरणदास यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखी सोहळा रंगला

कपालेश्‍वर महादेव ट्रस्टतर्फे दर सोमवारी पालखी सोहळ्याचे परिसरात आयोजन करण्यात येते. दुसरा श्रावणी सोमवार व प्रदोषमुळे आजच्या पालखी सोहळ्यास शिवभक्तांसह भाविकांची मोठी गर्दी होती.

कपालेश्‍वर मंदिरापासून निघालेली पालखी पुढे मालवीय चौक, सीतागुंफा, श्रीकाळाराम मंदिर पूर्व दरवाजा, सरदार चौकमार्गे रामतीर्थावर पोचली. श्रींना स्नान व अभिषेक झाला. पालखी सोहळ्यास प्रदोषमुळे मोठी गर्दी उसळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जहाजांची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा; इराणने दिली माहिती, सामंजस्य कराराचा मसुदा तयार

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी 'क्रिकेट देवा'चे खास ट्विट... क्रिकेट दिग्गजांकडूनही कौतुक! RR चा धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत देशात आज काय-काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक अपडेट

Mumbai-Goa Highway : झाडं लावली की फक्त कागदावरच दाखवली? मुंबई-गोवा महामार्गावरील 'त्या' 1 लाख 96 हजार वृक्षांचं नक्की काय झालं? प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

SCROLL FOR NEXT