Shravani Desai with the medal esakal
नाशिक

Nashik News: समुद्र स्पर्धेत लासलगावची श्रावणी देसाई प्रथम! स्पर्धेत सहभागी होणारी निफाड तालुक्यातील पहिली कन्या

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : पालघर जिल्ह्यातील राजोडी समुद्रात रविवारी (ता. ५) पॉवरपीक स्वीमेथाॅन राज्यस्तरीय स्पर्धा झाली. यात मुलींच्या १४ ते १८ वयोगटात येथील श्रावणी नीलेश देसाई हिने प्रथम क्रमांक पटकावला.

श्रावणी देसाई समुद्रात जलतरण स्पर्धेत सहभागी होणारी निफाड तालुक्यातील पहिली कन्या असून, पहिल्याच समुद्र स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळवला. (Shravani Desai of Lasalgaon first in sea competition First girl from Niphad taluka to participate in competition Nashik News)

रविवारी सकाळी सहाला १ किलोमीटर समुद्र स्पर्धेत श्रावणीने ३२ मिनिटे वेळ देत प्रथम क्रमांक मिळवला. राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक नामवंत खेळाडू सहभागी झाले होते.

श्रावणी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत असून, तिला तिचे वडील नीलेश देसाई व क्रीडाशिक्षक प्रा. डॉ. नारायण जाधव, प्रा गणेश जाधव, वसई येथील राकेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रावणीने यापूर्वी कोल्हापूर, लोणावळा, चेन्नई, नाशिक येथील अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून चांगली कामगिरी केली आहे.

श्रावणी देसाई लासलगाव स्वीमिंग असोसिएशनची सदस्य असून, दररोज खडक माळेगाव येथील बंधाऱ्यांमध्ये व लासलगाव महाविद्यालयाच्या जलतरण तलावात ती सराव करते. श्रावणीच्या या यशाबद्दल तिचे लासलगाव व परिसरात अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

SCROLL FOR NEXT