Shrikant Shinde News esakal
नाशिक

Shrikant Shinde News: आमचे सरकार ‘ऑफलाईन’ : शिंदे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ऑनलाईन काम करणारे नव्हे, तर ऑफलाईन काम करणारे आहे. मागच्या अडीच वर्षात राज्यातील जनतेने फक्त ऑनलाईन घोषणांचा पाऊस बघितला.

आताचे सरकार प्रत्यक्ष कृतीतून कामे करत आहे. समृद्धी महामार्ग याचे चांगले उदाहरण आहे. अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. (shrikant Shinde statement Our government offline nashik political news)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आले असताना खासदार शिंदे बोलत होते. ते म्हणाले, राजकारणाचा स्तर इतका घसरविला की, मुख्यमंत्र्यांचे चहापान, जेवणाच्या बिलांवरही आक्षेप नोंदविला जात आहे.

अडीच वर्षांपूर्वी ‘वर्षा’वर मंत्र्यांनाही जाता येत नव्हते. आता प्रत्येकासाठी वर्षाचे दरवाजे खुले आहेत. येथे आलेल्या प्रत्येकाच्या चहा-नाश्त्यासह जेवणाची व्यवस्था होते. त्यामुळे आता विरोधक मुख्यमंत्र्यांच्या जेवणाच्या खर्चाचेही राजकारण करीत आहेत.

कर्जाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले. येत्या आठ दिवसांत महापालिका क्षेत्रात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT