Bristled Grassbird
Bristled Grassbird esakal
नाशिक

Mustached Warbler : नांदूरमध्यमेश्वरमध्ये युरोपच्या मिशीवाला वटवट्याचे दर्शन

आनंद बोरा

नाशिक : उन्हाचे चटके बसत असताना नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये युरोपच्या मिशीवाला वटवट्याचे दर्शन झाले.

या पक्ष्याची खूप कमी नोंद महाराष्ट्रात आहे. राजस्थान, गुजरातपर्यंत आलेला हा पक्षी आता नांदूरमधमेश्‍वरमध्ये येऊ लागला. फेब्रुवारीमध्येही पक्ष्यांची संख्या वाढत आहे. (Sighting of European Mustached Warbler in Nandur Madhyameshwar nashik news)

नांदूरमध्यमेश्‍वरच्या पातळीत दोन वर्षांमध्ये पहिल्यांदा घट झाली आहे. त्यामुळे पक्ष्यांना खाद्य उपलब्ध होत आहे. यामुळे किमान महिनाभर पक्ष्यांचा मुक्काम वाढणार आहे. दरम्यान, वटवट्याच्या सहा जाती इथे पाहावयास मिळतात. त्यातील काही जातींचे तीस वर्षांनंतर दर्शन झाले.

दंगाखोर वटवट्या, धन वटवट्या, पायमोज वटवट्या, रेखांकित वटवट्या आणि आता मिशीवाला वटवट्या अशी त्याची नावे आहेत. धन वटवट्या हा पक्षी १९८९ मध्ये दिसल्याची नोंद वन विभागाच्या ‘चेकलिस्ट’ आहे. युरोपच्या मिशीवाला वटवट्या पाच वर्षांपासून अभयारण्यात आला नाही. तो गुजरात, राजस्थानमधून माघारी फिरत होता.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

गेल्या वर्षी अधिक पाऊस झाल्याने सर्व तलाव, धरणे, पाण्याने पूर्ण भरलेले असल्याने त्यांना खाद्य जवळ उपलब्ध झाले होते. त्यामुळे पक्ष्यांनी स्थलांतर करणे टाळले, असे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.

मिशीवाला वटवट्या याला ‘मस्टॅच्ड वार्बलर’ (अॅक्रोसेफॅलस मेलानोपोगॉन) असेही म्हणतात. हे पक्षी उत्तर-पश्चिम आफ्रिकेत काही प्रजननांसह दक्षिण युरोप आणि दक्षिण समशीतोष्ण आशियामध्ये त्यांची पैदास होते.

दक्षिण-पश्चिम युरोपीय पक्षी निवासी आहेत, दक्षिण-पूर्व युरोपीय पक्षी भूमध्यसागरीय प्रजनन श्रेणीत हिवाळ्यात आशियाई वंश अरब, भारत आणि पाकिस्तानमध्ये स्थलांतर करतात. मिशीवाला वटवट्या हा पक्षी कीटकभक्षी आहे.

पाण्यातील गोगलगाय हे त्याचे आवडते खाद्य आहे. बऱ्‍याचदा जमिनीवर अथवा पाण्याजवळ ते उडी मारतात. वारंवार शेपूट झटकतात आणि थोडीशी वर करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT