Bombay Sheildtail esakal
नाशिक

Nashik News : हरसूलच्या घाटात दुर्मिळ ‘Bombay Sheildtail' चे दर्शन

आनंद बोरा

नाशिक : तुम्ही कधी बीळ बनविणारा साप बघितला आहे का? नाही ना...हरसूलमधील जंगलात दुर्मळ ‘बॉम्बे अर्थ स्नेक' अर्थात, ‘बॉम्बे शील्डटेल' सापाचे दर्शन झाले आहे. हे सर्प जगात भारत आणि श्रीलंकामध्ये आढळतात. पश्‍चिम घाट आणि आणि द्वीपकल्पीय भारताच्या काही भागात दिसणारा हा सर्प हरसूलमध्ये पाहावयास मिळाला. (Sighting of rare Bombay Sheildtail at Harsul Ghat Nashik Latest Marathi News)

‘शील्डटेल' साप हे ‘युरोपेल्टीडे‘ कुटुंबातील आहेत. त्याच्या ५० हून अधिक प्रजाती आहेत. त्यांच्या शेपटीच्या टोकावर असलेल्या केराटिनस ढालवरून त्यांना नाव मिळते. हे सर्प बिनविषारी आहेत. भारतीय ‘हर्पेटोलॉजिस्ट' डॉ. सुब्रमण्यम भूपती यांच्या ‘हर्पेटोलॉजी‘ क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे नाव देण्यात आले.

पश्चिम घाटातील इतर अनेक प्रजातींप्रमाणे या जातीच्या सर्पाला वीट उद्योग, रोडकिल्स आणि संभाव्य प्राणघातक सापाच्या बुरशीजन्य रोगासारखे रोग यांच्याद्वारे मातीच्या शोषणामुळे अधिवास बदलासारख्या विशिष्ट धोक्यांना तोंड द्यावे लागते. सापांच्या या प्रजाती जमिनीतील नायट्रोजनच्या स्थिरीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात.

‘बॉम्बे शील्डटेल' सापाची एकूण लांबी २९.५ सेंटीमीटर असून डोक्याच्या मागे १७ ओळींमध्ये गुळगुळीत पृष्ठीय ‘स्केल' दिसतात. ओठांवर आणि मानेच्या बाजूला एक पिवळा पट्टा, त्यानंतर दोन ते पाच मोठे पिवळे ठिपके. शेपटीच्या प्रत्येक बाजूला एक पिवळा पट्टा दिसतो. शेपटीचा शेवट तिरकसपणे छाटलेला आहे.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

या कुटुंबातील ८ भिन्न प्रजाती ओळखल्या जातात. गांडुळे, कीटकांच्या अळ्या हे या सापाचे खाद्य आहे. निम्म्या पेक्षा अधिक आयुष्य हे साप जमिनीमध्ये राहतात. मगर, कासवप्रमाणे आदिकाळापासून या सापात फरक झाला नाही. अंडी पोटात ठेवून उबवून नंतर पिल्ले देणारा साप आहे.

"‘बॉम्बे शील्डटेल' साप बीळ करणारा म्हणून त्याची ओळख आहे. महाराष्ट्रात कमी प्रमाणात हा साप दिसतो. सापाच्या प्रजनानाविषयी अभ्यास होणे आवश्‍यक आहे."

- उमेशकुमार नागरे (निसर्ग अभ्यासक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT