ST. smart card esakal
नाशिक

Nashik : स्‍मार्ट कार्ड, नुसता ताप; ज्‍येष्ठांच्‍या व्‍यथा

अरूण मलाणी

नाशिक : एसटी बसगाड्यांमध्ये (MSRTC Bus) प्रवासासाठी ज्‍येष्ठांना स्‍मार्टकार्डची सक्‍ती करताना प्रशासनाने दुष्टचक्रात अडकविले आहे. ठसे जुळण्यात येणाऱ्या अडचणी, उतार वयात रांगांमध्ये उभे राहाण्याची ओढावणारी वेळ, चार हजार किलोमीटरच्‍या मर्यादित प्रवासासाठी सवलत व दरवर्षी नूतनीकरणासाठी (Renew) पुन्‍हा रांगांमध्ये उभे राहाणे अशा या दुष्टचक्रातून मुक्‍तता करत सुलभ पद्धतीचा अवलंब व्‍हावा, अशी मागणी ज्‍येष्ठ नागरिकांकडून सातत्‍याने होत आहे. (simpler approach should be adopted in Smart Card service of msrtc Nashik News)

कोरोना महामारीपूर्वी एसटी प्रशासनाने परिपत्रक काढताना सवलतीच्‍या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्‍मार्टकार्डची सक्‍ती केली. या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर ज्‍येष्ठ नागरिक एसटी बसने प्रवास करतात. स्‍मार्टकार्डची घोषणा केल्‍यानंतर ज्‍येष्ठ नागरिकांकडून स्‍मार्टकार्ड प्राप्त करून घेण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्‍या होत्‍या. यावेळी दमछाक करताना स्‍मार्टकार्ड प्राप्त करून घ्यावे लागले. या कार्डाचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागत असल्‍याने पुन्‍हा केंद्रापर्यंत दमछाक व रांगेत उभे राहताना ज्‍येष्ठांची हेळसांड होत आहे. त्‍यामुळे कार्डाऐवजी पूर्वीप्रमाणेच तहसीलदारांमार्फत प्रमाणित ओळखपत्राच्‍या आधारे पूर्वीप्रमाणे सवलतीच्‍या दरात प्रवास योजना उपलब्‍ध व्‍हावी, अशी मागणी केली जाते आहे.

प्री-पेड सुविधा पर्यायी, परंतु रिचार्जची सक्‍ती नाही

महामंडळातर्फे दिले जाणाऱ्या कार्डमध्ये वॉलेट सुविधा उपलब्‍ध करून दिली आहे. याद्वारे आगाऊ पैसे भरले तर प्रवासादरम्‍यान त्‍याचा वापर होऊ शकतो. तसेच अन्‍य एका वॉलेटमध्ये पैसे भरणा केल्‍यास त्‍यातून विविध ठिकाणी खरेदी केली जाते. टॉपअप रक्‍कमेवर पाच टक्‍यांपर्यंत अतिरिक्‍त पॉइंट दिले जातात. परंतु हे रिचार्ज करणे बंधनकारक नाही. वापरकर्त्यांना वाटले तर ते कार्ड दाखवत रोख रक्‍कम देऊन तिकीट खरेदी करू शकतात. प्री-पेड कार्डात पैसे दाखल करण्याची कुठलीही सक्‍ती नाही. तसेच कार्ड प्राप्त झाल्‍यावर चार हजार किलोमीटरचा प्रवास मोफत नसून, इतक्‍या अंतराच्‍या प्रवासासाठी शासन योजनेनुसार पन्नास टक्‍के तिकीट रक्‍कम लागते.

स्‍मार्टकार्ड वापरात ज्‍येष्ठांना येणाऱ्या प्रमुख अडचणी-

* चार हजार किलोमीटरच्‍या मर्यादित प्रवासासाठी तिकिटात सवलत

* कार्ड काढताना ठसे जुळविण्यात उद्भवतात अडचणी

* कार्ड काढणे, नूतनीकरणासाठी स्‍थानक, केंद्रापर्यंत होते दमछाक

* निर्धारित मुदतीत कार्ड प्राप्त होत नसल्‍याने करावी लागते चार ते सहा महिने प्रतीक्षा.

* अनेक वेळा कार्डावर माहिती चुकल्‍याने मनस्‍तापाला सामोरे जावे लागते

* नुतनीकरणाअभावी तांत्रिक बाबींमुळे काहीवेळा मोजावे लागतात तिकिटाचे पूर्ण पैसे

* कार्ड गहाळ झाल्‍यास नव्‍याने कार्ड काढताना होतो मनस्‍ताप.

ज्‍येष्ठांना दिलेले आगारनिहाय स्‍मार्टकार्ड-

खासगी केंद्र (१२२ केंद्र)--------१ लाख ७ हजार २०५

इगतपुरी--------------------------४,६६६

कळवण---------------------------४,०७७

लासलगाव-----------------------५३८

मालेगाव-------------------------१०७१४

मनमाड-------------------------१,६७६

नांदगाव-------------------------३,४२८

नाशिक एक---------------------५,९६९

नाशिक दोन (पंचवटी)--------८,३९७

पेठ------------------------------३,४४६

पिंपळगाव बसवंत------------२,६४१

सटाणा-------------------------७,४२२

सिन्नर------------------------३,७१५

येवला--------------------------३,४७६

"स्‍मार्टकार्ड सक्‍तीमुळे अनेक ज्‍येष्ठ नागरिकांची हेळसांड होते. पूर्वीप्रमाणे एसटी प्रवासात सवलतीसाठी अन्‍य ओळखपत्र ग्राह्य धरले जावे. तसेच शहरातील सिटी बस वाहतुकीसाठीदेखील ज्‍येष्ठ नागरीकांना सवलतीच्‍या दरात प्रवास करता आला पाहिजे."

-वसंतराव जाधव, ज्‍येष्ठ नागरिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: भारताने शेवटच्या क्षणी पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला तर काय होईल? सुपर-४ मध्ये प्रवेश मिळेल का?

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

SCROLL FOR NEXT