sinnar flood news esakal
नाशिक

देवपूरचा पूल तुटल्याने अंत्यविधीसाठी ग्रामस्थ राहतात ताटकळत!

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : संपुर्ण शहरात तालुक्यात दोन तीन दिवसात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने अनेक ठिकानी कोट्यवधी रुपयांची हानी झाली. कुटुंबे, दुकान याचे अतोनात नुकसान झाले पावसाने जन जिवन विस्कळीत झाले. त्याच धर्तीवर तालुक्यात सुद्धा अनेक ठिकाणी अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे अशातच सिन्नर तालुक्यातील देवपूर गावात ये जा करण्यासाठी सिन्नर खोपडी मार्गे रस्ता आहे.

गावचा रस्ता हा खोपडी सिन्नर या मुख्य रस्त्या जोडलेला आहे.तो पुल रस्ता वाहुन व तुटुन गेल्याने गावकर्यांना मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहेत. ढगफुटीमुळे देवनदीला आलेल्या पुरामुळे देवनदीवरील अनेक ठिकाणचे पूल तुटल्याने दळणवळण ठप्प झाले आहे.देवपूर येथील देवनदीवरील पूल तुटल्याने स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.

सुमारे दोनशे तीनशे मीटर स्मशानभूमी जवळ असताना सुमारे 15 किलोमीटर फिरून स्मशानभूमीकडे जावे लागत आहे अशातच गावातील सूर्यभान म्हसुजी गायकवाड या ग्रामस्थाच्या मृत्यूनंतर त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत नेण्यासाठी पर्यायी मार्गाने जावे लागले.४ ते ५ गावांच्या हद्दीतून साधारणपणे १५ किमी अंतरावरून ही प्रेतयात्रा गावच्या नदीच्या पलीकडे असलेल्या स्मशानभूमीत पोहचली.

कारण पावसाचे दिवस असल्याने अंत्यविधी करायला जागा नसल्याने अंत्यविधीसाठी सुमारे 15 किलोमीटर गावाला वळसा घालून जावे लागले तसेच राखेच्या कार्यक्रमासाठी काही नातेवाईकांनी गावाच्या अलीकडे उभे राहत कार्यक्रम हजेरी लावली तसेच अंत्यविधीसाठी पूल तुटलेल्या रस्त्यावर ग्रामस्थांनी उभे राहत श्रद्धांजली वाहिली हे दृश्य अस्मानी संकट निर्माण झाल्याने याकडे संबधित विभागाने लक्ष दयावे व लवकरच रस्ता दुरूस्ती करावे व अधिकारयांना तात्काळ दुरूस्ती करण्याचे आदेश दयावे . अशी मागणी देवपूर ग्रामस्थांकडुन करण्यात आली आहेत.

चौकट सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार केलेला असल्याने अनेकांची शेती, कुटुंब, घरे, दुकाने याचे कधी न भरून निघणारे नुकसान आतोनात झालेले असताना शासनाने मदत करण्याचे आश्वासन येत्या दोन दिवसात दिल्याने प्रशासन मदत कार्य करीत आहेत अशातच अनेक पूल रस्ते हे वाहून गेल्याने संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर पूल रस्त्यांची पाहणी करून मदत कार्य मिळून द्यावे अशी मागणी अनेक ग्रामस्थांकडून होत आहे.

तालुक्यातील अनेक गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी असणारे पूल रस्ते वाहून गेल्याने शाळेत जाण्यासाठी लांब पल्ल्याचा रस्त्यांचा आधार घ्यावा लागत आहे व सुमारे एक ते दीड तास हा शाळेत जाण्यासाठी लागत आहे विद्यार्थ्यांची गैरसोय तसेच शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेत तालुक्यातील अनेक पुलांची व रस्त्यांची दुरुस्ती होणे खूप महत्त्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi : साई बाबांच्या नगरीत हे काय सुरुय? संस्थानच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत मोठी खळबळ, धक्कादायक कारण समोर, पाहा VIDEO

Suryakumar Yadav: '... तर मला भारताच्या वनडे संघाचंही कर्णधारपद मिळालं असतं', सूर्यकुमार नेमकं काय म्हणाला? वाचा

Latest Marathi News Live Update : धनत्रयोदशीनिमित्त सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांची लगबग

दिवाळी गिफ्ट काय द्यावं हेसुद्धा कळेना! पंढरपूर विठ्ठल मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिला चिकन मसाला, BVG कंपनीचा अजब कारभार

Pune - Nashik हायवेवर 'ट्राफिक जाम'ची दिवाळी! प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT