onion market.jpg
onion market.jpg 
नाशिक

सिन्नरला सोमवारपासून कांदा, भुसार मालाचे लिलाव पूर्ववत 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचे लिलाव सोमवार (ता.30)पासून पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, उपसभापती सुधाकर शिंदे व सचिव विजय विखे यांनी दिली. 

कांद्यासह धान्य भुसार मालाचे लिलाव पूर्ववत
सिन्नर येथील मुख्य बाजार आवारात तसेच नांदूरशिंगोटे व दोडी बुद्रुक येथील उपबाजारात कांद्यासह धान्य भुसार मालाचे लिलाव पूर्ववत करण्यात आला आहे. कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बाजार बंद करण्यात आला होता. मात्र जीवनावश्‍यक असणाऱ्या कांदा, धान्य व भुसार मालाची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी नांदूरशिंगोटे, दोडी येथील व्यापाऱ्यांत शुक्रवारी (ता. 27) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

ओळखपत्र देण्यात येणार
या निर्णयानुसार कांदा लिलाव दर मंगळवारी व गुरुवारी सकाळी दहाला, तर धान्य व भुसार मालाचे लिलाव दर सोमवारी, बुधवारी व शुक्रवार सकाळी अकराला होतील. नांदूरशिंगोटे उपबाजार आवारात कांदा शेतमालाचे लिलाव दर शुक्रवारी दुपारी एकला सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दोडी बुद्रुक उपबाजारात कांदा शेतमालाचे लिलाव दर बुधवारी दुपारी चारला सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बाजार समिती संबंधित सर्व घटकांना दैनंदिन कामकाज करणे सोपे होण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे सभापती तांबे यांनी सांगितले. 

हेही वाचा > #Lockdown : 'ताई, खूप दिवसांनी घरचं जेवण मिळालं!'...अन् 'त्या' पोलिसांचे डोळे पाणावले​
बाळासाहेब चकोर, सुनील चकोर, अनिल कलंत्री, दिलीप खिंवसरा, प्रकाश लढ्ढा, कन्हय्यालाल पारख, निवृत्ती तुपे, विजय तेलंग, शिवनारायण कलंत्री, मंगेश करपे, भाऊसाहेब भाबड, विजय सानप, भारत मुंगसे, सुधाकर शेळके, बाळासाहेब सांगळे, आर. एन. जाधव, पांडुरंग जाधव, ए. एम. परदेशी आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT