night.jpg 
नाशिक

दुर्देवी! पहाटेची वेळ...गर्भवती मादीने अचानक पुलावरुन मारली उडी...असं काय घडलं?

किशोरी वाघ : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (सिन्नर) पहाटेची वेळ...सरदवाडीजवळील वळण रस्त्यावर धक्कादायक घटना घडली. बुधवारी (ता.22) पहाटे ५.३० च्या सुमारास ते जोडपं करत होते रस्त्यावर मुक्तसंचार...पण नियतीच्या मनात होते वेगळेच. अन् अचानक पुलावरुन गर्भवती मादीनी घेतली खाली उडी...असं काय घडले?

अशी आहे घटना

सरदवाडी धरण परिसरात अन्नपाण्याच्या शोधात हरणाचं जोडपं आलं होतं. जवळून जाणाऱ्या नाशिक-पुणे वळण रस्त्यावरून जात असताना बुधवारी (ता.22) पहाटे ५.३० च्या सुमारास रस्त्यावरील पुलावर भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने या जोडप्यातील नर हरणाला जबर धडक दिली. या अपघातात नराच्या डाव्या पायाला जबर मार लागला तर घाबरलेल्या हरणाच्या मादीने पुलावरून खाली उडी मारली.

अतिरक्तस्रावाने मृत्यू

सुमारे ३० ते ४० फूट उंचावरून गर्भवती असलेली मादी पोटावर पडली. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला तर वर रस्त्यावर नर हरीण जखमी अवस्थेत पडून होते. त्यानंतर काही वेळाने जवळून जाणाऱ्या स्थानिक नागरिकांनी हरणांच्या अपघाताचे दृश्य पाहून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना दुरध्वनीवरून माहिती दिली.

दोन्ही हरणांचे मृतदेह मोहदरी वनउद्यानात दफन

वाजे यांनी तात्काळ युवामित्र संस्थेच्या रुग्णवाहिकेला पाचारण करून या रुग्णवाहिकेतून मादी व नर हरणाला उपचारार्थ पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविले. तेथे पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेश दुबे व डॉ. मिलिंद भणगे यांनी जखमी नरावर उपचार सुरू केले; मात्र उपचारा-दरम्यान नर हरणाचीही प्राणज्योत मालवली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही हरणांचे मृतदेह मोहदरी वनउद्यानात दफन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT