Property Dispute esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: बहिणीचाच हिस्सा भावाने लाटला! निफाड न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

याप्रकरणी बहिणीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर भावासह दोन्ही भाच्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रॉपर्टीसाठी रक्ताची नातीही रक्ताची राहिली नाहीत. अगदी जीव घेण्यापर्यंत मजल जाते आहे. वडलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये मुलांप्रमाणे मुलींनाही समान हक्क देण्यात आलेला आहे.

असे असतानाही एका भावाने चक्क सख्ख्या बहिणीचा हिस्सा तिला देण्याऐवजी स्वत:च्या मुलांच्या नावे बक्षिसपत्रान्वये करून देत फसवणूक केली आहे.

याप्रकरणी बहिणीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर भावासह दोन्ही भाच्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (sister property share stolen by brother Niphad court ordered to file case Nashik Crime)

वंदना प्रकाश वाळेकर (रा. कल्याण वेस्ट) या मूळच्या निफाड तालुक्यातील विष्णूनगर येथील. मात्र विवाहानंतर त्या कल्याण येथे स्थायिक झाल्या. विष्णूनगर येथे वडलोपार्जित मिळकत (प्रॉपर्टी) होती.

दरम्यान, त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर मिळकतीच्या सात बार्याला त्यांची आईसह त्यांचे व भावांची नावे लागली होती. पाच भावंडांमध्ये मिळकतीचे समसमान वाटप करून वंदना यांनी भाऊ पुंडलिक याच्याकडे हिस्सा मागितला होता.

परंतु नेहमी वडलोपार्जित मिळकतीच्या हिस्साचा विषय निघाला की पुंडलिक याच्याकडून टाळाटाळ केली जात होती. यामुळे वंदना यांना भावाचा संशय आला असता, त्यांनी निफाड तहसिलमध्ये कागदपत्रांची माहिती घेतली असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

सख्ख्या भावाने बहिणीचा वडलोपार्जित मिळकतीतील हिस्सा हिरावला होता. याप्रकरणी वंदना पाळेकर यांनी निफाड न्यायालयात धाव घेत फौजदारी खटला दाखल केला.

ॲड. राहुल पाटील यांनी युक्तिवाद करीत बाजू मांडली. न्यायालयाने भाऊ पुंडलिक सुरासे, भाचे यतिन व नितीन सुरासे (रा. विष्णुनगर, ता. निफाड) यांच्याविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनात बक्षिसपत्र

वडलोपार्जित मिळकत असल्याने पाच भावंडांमध्ये त्याचे समसमान वाटप होणे अपेक्षित असताना, पुंडलिक यांनी बहीण वंदना यांचा १/५ हिस्सा असताना तो १/३ दाखवून तोही स्वत:चे मुले यतिन व नितीन यांच्या नावावर बक्षिसपत्र नोंदवून घेतले.

ही बाब वंदना यांनी जेव्हा निफाड तहसिलमध्ये जाऊन कागदपत्रे पाहिली तेव्हा समजली. पुंडलिक यांनी कोरोना काळामध्ये सदरचा प्रकार केल्याचे समोर आले. यासंदर्भात वंदना यांनी भाऊ पुंडलिक व भाच्यांविरोधात निफाड न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT