corona second patient 11.jpg 
नाशिक

Nashik Corona Update : शहरातील तिन्ही क्षेत्र रेड झोन; सहा जणांना कोरोनाची लक्षणे 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात तीन रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेतर्फे गोविंदनगर, आनंदवली व नाशिक रोड या तीन भागात रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत दोन हजार 938 घरांना भेटी देण्यात आल्या. त्यात दहा हजार 711 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. रविवार व सोमवार या दोन दिवसांत सहा नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात आले. 

कोरोनाबाधित क्षेत्रात सहा जणांना लक्षणे 
नाशिक शहरात तीन कोरोना संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पहिला रुग्ण गोविंदनगर, दुसरा आनंदवली येथील नवशा गणपती भागातील, तर तिसरा रुग्ण नाशिक रोडच्या जलतरण तलाव परिसरातील आहे. महापालिकेतर्फे तातडीने या भागात रेड झोन जाहीर करून सहाशे मीटर अंतरापर्यंत प्रतिबंध करण्यात आला. गोविंदनगर भागात 22 वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून पाच हजार घरांची तपासणी करण्यात आली. नवशा गणपती परिसरात बारा वैद्यकीय पथक, तर नाशिक रोड भागात 21 वैद्यकीय असे 55 वैद्यकीय पथके तीन भागात तैनात करण्यात आले. पथकांच्या माध्यमातून रविवार व सोमवार असे दोन दिवस रेड झोनमधील दोन हजार 938 घरांना भेटीच्या माध्यमातून दहा हजार 711 नागरिकांची तपासणी करण्यात आली. किरकोळ सर्दी, खोकल्यावर तत्काळ औषधे दिली जात आहेत. तर ताप व घशात खवखव असल्यास रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला जात आहे. 

स्वच्छतेसाठी स्वतंत्र तीन घंटागाड्यांची व्यवस्था
रविवारी झालेल्या वैद्यकीय तपासणीत दोन संशयित आढळले, तर सोमवारी चौघांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. या भागात सोडियम हायपोक्‍लोराइड औषधाची फवारणी केली जात आहे. अधिक स्वच्छतेसाठी स्वतंत्र तीन घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yuzvendra Chahal: क्रिकेटर युझवेंद्र चहलची भाजपमध्ये एन्ट्री; ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय टीममध्ये मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : बिल्डरांसाठी शहरातील ४७ नाले वळविले; महापालिका सभागृहात प्रशासनाची माहिती

Ambad Accident : दुचाकी चालक युवक विजेच्या पोलला धडकल्याने अपघातात जागीच ठार: परीक्षेचा पेपर देऊन तीर्थपुरीला जाताना घडली घटना

Beed Crime : ५१.९० लाखांचे तेल परस्पर विकून रचला अपघाताचा बनाव; टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai News : १५० रेल्वे स्थानकांवर लवकरच ड्रोनची गस्त! लोकलच्या सुरक्षेला १४ हायटेक उपकरनाचे कवच

SCROLL FOR NEXT