coronavirus_gen_jpg.jpg 
नाशिक

Coronaupdate : जिल्ह्यात कोरोना तपासण्यांचा साठ हजारांचा टप्पा पूर्ण...पॉझिटिव्‍हचे २५.७५ टक्‍के प्रमाण!

अरुण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात आतापर्यंत ६० हजार ५१९ संशयितांची स्‍वॅब चाचणी करण्यात आली. त्यात आतापर्यंत १५ हजार ५८५ कोरोनाबाधित आढळले असून, ४४ हजार १५० जणांचे अहवाल निगेटिव्‍ह आले. तपासणीतून आढळलेल्‍या कोरोनाबाधितांचे प्रमाण २५.७५ टक्‍के आहे.

आतापर्यंत ५२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू 

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान प्रशासकीय व आरोग्‍य यंत्रणेपुढे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील १३ जणांचा समावेश असून, त्यात पंचवटीतील ५३ वर्षीय पुरुष, देवळाली राजवाडा येथील ६० वर्षीय महिला, उपनगर येथील ७१ वर्षीय पुरुष, नाशिक रोड येथील ६० वर्षीय पुरुष, जुना आडगाव नाका परिसरातील ५२ वर्षीय पुरुष, अंबड लिंक रोडवरील ५२ वर्षीय पुरुष, मुंबई नाका येथील ८४ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील ७२ वर्षीय पुरुष, आरटीओ कॉर्नरवरील ५२ वर्षीय पुरुष, हनुमानवाडीतील ६९ वर्षीय पुरुष, पाथर्डी फाटा येथील ५२ वर्षीय पुरुष, वडाळा रोडवरील ६९ वर्षीय पुरुष आणि नाशिक रोडच्‍या एकतानगर येथील ६१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

रविवारी नाशिक शहरात ४५० कोरोनाबाधित

ग्रामीण भागातील चार मृतांमध्ये येवल्‍यातील ७२ वर्षीय पुरुष, देवळाली कॅम्‍पमधील ५५ वर्षीय पुरुष, बोराळे शिवारातील ५७ वर्षीय पुरुष आणि ओझर टाउनशिप येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. रविवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ४५०, ग्रामीण भागातील ६७, मालेगावचे नऊ आणि जिल्‍हाबाह्य दोन रुग्ण आहेत, त, कोरोनावर मात केलेल्‍या २२९ रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १३७, ग्रामीण भागातील ८०, मालेगावचे दहा आणि जिल्‍हाबाह्य दोन रुग्‍णांचा समावेश आहे. दिवसभरात शहरातील ६४२ रुग्‍णांसह ग्रामीणमधील ८८, मालेगावचे २४, गृहविलगीकरणा त ६५ असे एकूण ८१९ संशयित आढळून आले आहेत.  

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Nagpur Garage Fire: नोकरीवरून काढल्याच्या रागातून गॅरेजला आग!; २० दुचाकी जळाल्या; माजी कर्मचाऱ्यावर संशय, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

वीर पहाडियाचा रोमँटिक अंदाज, आफिया सय्यदचं पदार्पण; ‘प्रेम कीटाणू’ ठरतोय तरुणाईचा सिनेमा?

SCROLL FOR NEXT