Former Chairperson Suvarna Jagtap, Shiva Sureshe, Vilas Ahire, Chandrasekhar Shinde and Sandeep Thombre during onion procurement through sub agency. esakal
नाशिक

Onion Purchase : ‘नाफेड’च्या एजन्सीद्वारे लाल कांद्याची अल्प खरेदी; 1 हजार 739 वाहनांतून कांदा आवक

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव (जि. नाशिक) : येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर नाफेडच्या सब एजन्सीद्वारे लाल कांदा अल्प प्रमाणात खरेदीला सुरवात झाली. माजी सभापती सुवर्ण जगताप व शेतकरी प्रतिनिधी शिवा सुराशे उपस्थित होते.

शुक्रवारी (ता. ३) लासलगाव येथे बाजार समितीच्या आवाराबाहेर ‘नाफेड’ने नेमलेल्या एजन्सीज न्युट्रोव्ही ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे कृष्णधारा फार्मर्स कंपनीने दोन दिवसांत अल्प प्रमाणात खरेदी केली. (Small purchase of red onion through agency of NAFED Onion arrival from 1 thousand 739 vehicles nashik news)

गुरुवारी (ता. २) सहा ट्रॅक्टरमधून १६८ क्विंटलची खरेदी ८७१.७५ रुपये दराने झाली, तर शुक्रवारी १५० क्विंटल कांद्याची ९३१.७५ रुपये दराने खरेदी झाली. सदर कंपन्या हेक्टरी १५६ क्विंटल कांदा खरेदी करतात, त्यासाठी ४५ ते ६० एमएम कांदा व सिंगल पत्ती असा कांदा खरेदी करतात.

यासाठी शेतकऱ्यांकडून आधार कार्ड, पासबुक व सातबारा उताऱ्यावर पीक पेरा याची नोंद बघितली जाते. खरेदीनंतर काही दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात. शुक्रवारी खडक माळेगाव येथील शेतकरी राजेश शिंदे यांनी आपला ३५ क्विंटल कांदा ९३१ रुपये दराने विकला.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी एक हजार ७३९ वाहनांतून ३५ हजार ५०२ क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी भाव चारशे रुपये, तर जास्तीत जास्त भाव एक हजार ५१, तर सरासरी भाव ७५१ रुपये होता.

‘नाफेड’च्या माध्यमातून सब एजन्सीद्वारे खरेदी करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखे आहे. ‘नाफेड’ने प्रत्यक्षात लिलावात सहभाग घेऊन व्यापारी व नाफेड यांच्यात स्पर्धा होऊन शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळू शकेल, असे शेतकरी शिवा सुराशे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT