nashik
nashik  esakal
नाशिक

Nashik : आधुनिक कुंभमेळा होण्यासाठी स्मार्टसिटी कंपनी सरसावली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेसह पोलिस यंत्रणेच्या कामकाजात सुसूत्रता येणे बरोबरच आधुनिक पद्धतीने कुंभमेळा होण्यासाठी स्मार्टसिटी कंपनी सरसावली आहे. कुंभमेळ्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर प्रकल्पास शनिवारी (ता. २४) मान्यता देण्यात आली. (Smart City Company took initiative to be modern Kumbh Mela in nashik Latest Marathi News)

नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची २३ वी बैठक अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडली. बैठकीच्या प्रारंभी महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या वित्तीय विवरण पत्रास मान्यता देण्यात आली.

स्मार्टसिटी कंपनीकडून भूमिगत जलवाहिनी व विद्युत वाहिनी टाकले जात आहे. भविष्यात दुरुस्ती किंवा अन्य कामासाठी खोदाई करण्याऐवजी जीआयएस मॅपिंगद्वारे ठिकाण शोधून नेमकी दुरुस्ती करण्यासाठी यासाठी जीआयएस मॅपिंग करण्यासाठी एजन्सी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शुद्धीकरण केंद्रांचे आधुनिकीकरण व पाण्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी स्काडा तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर बैठकीस मनपा आयुक्त मनपा, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, तसेच भास्करराव मुंढे, तुषार पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे आणि स्मार्टसिटीचे विभागप्रमुख उपस्थितीत होते.

कुंभमेळ्याची तयारी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात महापालिका व पोलिस विभागासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर प्रकल्प तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत शहरात सीसीटीव्ही बसविणे, सीसीटीव्हीसाठी आवश्यक यंत्रणा बसविणे, शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा निर्माण करणे, पोलिस विभागाचे पोर्टल सुधारित करणे व त्यासाठी सॉफ्टवेअर निर्मिती आदी प्रकारच्या माहिती तंत्रज्ञानाच्या संबंधित बाबींचा समावेश आहे.

होळकर पुलावर स्मार्ट प्रणाली

पंचवटी व पूर्वीच्या नवीन नाशिकला जोडणाऱ्या अहिल्याबाई होळकर पुलाला ( व्हिक्टोरिया पूल) शंभर वर्षे पूर्ण होऊन गेले आहे. त्यामुळे व्हीजेएनआयटी अहवालानुसार अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. मात्र, असे असले तरी भविष्यात पुलाला धोका निर्माण झाल्यास त्याची माहिती कमांड कंट्रोल सेंटरला तत्काळ उपलब्ध व्हावी. या उद्देशाने तसेच रोजच्या वाहतुकीमुळे पुलावर काय परिणाम होता, याची माहिती मिळण्यासाठी स्मार्ट ब्रिज प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संचालक मंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

- पंचवटी व बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र प्रकल्पाचे आधुनिकीकरण.

- प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्त करणार.

- स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविण्यासाठी पुनर्निविदा.

- पंचवटीतील पंडित पलुस्कर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या अतिरिक्त खर्चाला मान्यता.

- राज्य सरकारच्या महाआयटी कंपनीमार्फत नाशिक सेफ ॲन्ड स्मार्टसिटी प्रकल्प.

- गोदा प्रकल्प, गोदा सौंदर्यीकरण प्रकल्प, मेकॅनिकल गेट प्रकल्प कामांना मुदतवाढ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT