Digital classroom reference latest marathi news esakal
नाशिक

महापालिका शाळेमधील विद्यार्थी होणार स्मार्ट; 656 डिजिटल क्लासरूम

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या शाळांमध्ये (Municipal Schools) शिक्षण घेणारा विद्यार्थी खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत उतरविण्यासाठी नाशिक महापालिका (NMC) व नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (Nashik Municipal Smart City Development Corporation Limited)

कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ६९ शाळांमधील ६५६ वर्ग डिजिटल केले जाणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षणाची सुविधा दिली जाणार आहे व घरी अभ्यास करण्यासाठी अॅपसुद्धा दिले जाणार आहे. स्मार्टसिटीच्या माध्यमातून डिजिटल शिक्षणाची मदतीने शिक्षकांना अवघड विषय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडता येणार आहे. (smart city project 656 Digital Classroom for municipal schools nashik Latest marathi news)


खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याने ते मागे पडत असल्याचे काहीसे चित्र आहे. हे चित्र स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून आता बदलणार आहे. आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीने महापालिकेच्या शाळा स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका, स्मार्टसिटी कंपनीच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल बोर्ड लागणार आहे.

डिजिटल कॉन्टेन्ट, व्हिडिओज, इमेजेस, ग्राफिक्स, अ‍ॅनिमेशन, कारओके कविता या सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. शाळांमध्ये डिजिटल लॅबदेखील उभारली जाणार आहे. ज्यात आयटी आणि आयसीटी संदर्भातील ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. लॅबमध्ये कॉम्प्युटर्स व इंटरनेट सुविधाही पुरविली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना संगणक व इंटरनेट वापराचे ज्ञान मिळेल.

पहिली ते दहावीपर्यंतचा महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्व अभ्यासक्रम व सर्वांगीण विकासाठी उपयुक्त विविध गोष्टी डिजिटल स्वरूपात राहणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा यासंदर्भात शिक्षकांनादेखील प्रशिक्षण दिले जाणार आहे.

शाळांचा दर्जा सुधारणे, विविध तंत्रांचा वापर करून मुलांना उत्तम दर्जाचे आधुनिक पद्धतीचे शिक्षण देणे, डिजिटल क्लास रूमच्या माध्यमातून परस्पर संवादी तंत्रे, मल्टिमीडिया सामग्री वापरण्याचे प्रशिक्षण मिळेल. शाळांमध्ये ई- बुक्स, प्रोजेक्टर, डिजिटल बोर्ड अशा सुविधा राहतील.

यासाठी महापालिकेत ई- लर्निंग सेंटर उभे केले जाणार आहे. स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून शहर स्मार्ट होत असताना विद्यार्थीदेखील स्मार्ट होणार असल्याने या नव्या उपक्रमाचे शहरातून स्वागत होत आहे. विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच नवीन शिक्षण प्रणाली शिकायला मिळेल.

विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारी शैक्षणिक सामग्री तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मिळेल. स्मार्ट क्लासरूम, स्मार्ट ॲप, सर्वांगिण विकास असणारा अभ्यासक्रम, मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून चांगला कन्टेन्ट, मूल्य शिक्षण, योग शिक्षण, डिजिटल साक्षरता, मेमरी टेक्निक्स, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांना स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून मिळणार आहे.

काय असेल डिजिटल वर्गांमध्ये?
महापालिकेच्या ६९ शाळांमधील ६५६ वर्ग डिजिटल केले जाणार आहेत. वर्गांमध्ये डिजिटल बोर्ड राहतील. बोर्डावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी डिजिटल कॉन्टेन्ट, व्हिडिओ, इमेजेस, ग्राफिक्स, अ‍ॅनिमेशन या सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. शिक्षकांना डिजिटल वर्गांमुळे विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे होणार आहे.

"खासगी शाळांमध्ये डिजिटलायझेशनच्या ज्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरविल्या जातात त्या सुविधा आता महापालिकेच्या शाळांमध्ये मिळेल. आधुनिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढेल. खासगी शाळांच्या तुलनेत विद्यार्थी अपडेट राहतील. मुलांना वेगळ्या प्रकारची शिक्षणाची गोडी लागेल. विद्यार्थ्यांची संख्या वाढेल. महापालिकेच्या शाळांकडे कल वाढेल. तसेच दृष्टिकोनात बदल होईल." - सुमंत मोरे, सीईओ, स्मार्टसिटी कंपनी

"महापालिकेच्या शाळा डिजिटल करताना विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सुकर होईल. त्याच बरोबर त्यांच्यातील कौशल्यांचा विकास होईल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या सुविधांवर आपला भर राहणार आहे." - अनिल तडकोड, आयटी महाव्यवस्थापक, स्मार्टसिटी कंपनी.

"महापालिकेच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी तळागाळातील आहे. डिजिटल प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, खासगी शाळांप्रमाणे सुविधा उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल. अभ्यासक्रम शिकविणे शिक्षकांना सोपे होणार आहे."
- सुनीता धनगर, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT