Snake sitting on the statue of Mahadev Shankara in the temple here. esakal
नाशिक

Nashik : अबब! शंकराच्या मूर्तीवर अवतरले चक्क नागराज

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : महादेव शंकराच्या मंदिरात पूजा सुरु आहे अन त्याचवेळी मूर्तीवर फणा काढून नागराज अवतरले असे सांगितले तर नक्कीच विस्वास बसणार नाही...पण येथे आज ही घटना घडली अन शहरभर एकच चर्चा सुरु झाली! (Snake sitting on idol of Shankar at yeola Nashik Latest Marathi News)

सोमवारनिमित्त येथील अमरधाममधील महामृत्युंजय मंदिरात कालाष्टमीनिमित्त महामृत्युंजय जप व यज्ञ सुरू होता. याचवेळी शंकराच्या मूर्तीवर अचानक नागराज अवतरले. त्यांनी शंकराच्या ठोक्यावरून फणा काढून भाविकांना दर्शन दिले. नेमक्या सोमवारीच झालेल्या या घटनेबाबत येवलेकरांनी आश्चर्य व्यक्त केले.

भगवान भोले शंकराच्या मूर्तीवर नागराज अवतरल्यानंतर या नागराजांनी भगवान शंकराच्या गळ्याला वेढा देऊन फणा काढत तेथेच ठाण मांडले. हा सर्व प्रकार येथील भाविकांनी पाहिल्यानंतर भाविकांनी देखील कुठलाही आरडाओरडा न करता सर्पमित्राला याबाबत माहिती दिली. सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन या नागराजाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. शहरात आज या घटनेची चर्चा परिसरात होताच नागरिकांनी मंदिराच्या दिशेने धाव घेऊन दर्शनासाठी गर्दी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : संरक्षण नाही तर 'या' क्षेत्रावर होणार सर्वाधिक खर्च! शेती आणि शिक्षणावर किती खर्च? शेतीसाठी पैसे वाढले?

Union Budget-2026 : ''तरुणांकडे नोकरी नाही, शेतकरी संकटात, हा अर्थसंकल्प म्हणजे...''; राहुल गांधींची टीका; खरगेंनीही मोदी सरकारला केलं लक्ष्य

Budget 2026 Analysis : यंदाचा 'अर्थसंकल्प' मध्यवर्गीय, ज्येष्ठ नागरीक, शेतकरी अन् गुंतवणुकदारांसाठी नेमका कसा?

Union Budget 2026: पुढील दशक खेळाडूंचे! क्रीडा क्षेत्रासाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Latest Marathi News Union Budget 2026: रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर

SCROLL FOR NEXT