नाशिक

Diwali Pahat 2023: पिंपळपारावर सजला स्वरांचा थाट! स्मिती मिश्रा यांचे संस्कृती नाशिक पाडवा पहाटमध्ये गायन

सकाळ वृत्तसेवा

Diwali Pahat 2023 : भगवान कृष्णावर तोडी रागातील ‘तेरो ध्यान करो सावरो’, बडा ख्यालमध्ये गायिलेले ‘बीन हरी कौन’, जागी जगदंब जागिनी’ अशा बडा ख्याल, द्रुतख्याल राग, भैरव, ठुमरी, अभंगाने मंगळवारी (ता. १४) पहाटे पाचला नेहरू चौकातील पिंपळपारावर स्वरांचा थाट सजला. निमित्त होते संस्कृती नाशिकच्या २५ व्या रौप्य महोत्सवी पाडवा पहाटचे.

ग्वालहेर घराण्याची युवा गायिका पंडिता स्मीती मिश्रा यांनी पिंपळपारावर अफलातून गायन करून नाशिककर रसिक श्रोत्यांची दाद मिळविली. पंडिता स्मीती मिश्रा यांनी बढा ख्यालाने सुरवात केली. बंदिशमध्ये ‘सारी जामिनी जागरे’ ठुमरी, भैरवीत ‘नैना मोरे तरस गये’, ‘आजा बलम परदेसी रे’ यां गाण्यांनी श्रोत्यांची मने जिंकली. (Sniti Mishra Sanskriti Nashik Padwa singing in diwali Pahat news)

काश्मिरी रचनांनी पाडवा पहाट उत्तरोत्तर रंगत गेला. किशोरी अमोनकर यांच्या श्याम सुंदर गाण्याने संस्कृती नाशिक पाडवा पहाट कार्यक्रमाचा समारोप झाला. पंडिता स्मीती मिश्रा यांना तबला- पंडित अजित पाठक, सारंगी- उस्ताद मोमीन खान, संवादिनी- ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित सुभाष दसककर, तानपुरा- गायत्री पाटील, साक्षी भालेराव यांनी साथसंगत केली. पियू आरोळे यांनी सूत्रसंचालन केले.

संस्कृती नाशिकच्या २५ व्या रौप्य महोत्सवी पाडवा पहाट कार्यक्रमात डॉ. कैलास कमोद यांचा संस्कृती नाशिक पुरस्काराने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते सप्तनीक सन्मान करण्यात आला. कवी मिलिंद गांधी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.

या प्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन पवार, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, भाजप प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी, सरचिटणीस सुरेश पाटील, महापालिका माजी सभागृह नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिटूटचे संचालक डॉ. अनिरूद्ध धर्माधिकारी, माजीमंत्री शोभा बच्छाव, मंगला कमोद, बबनराव घोलप, उल्हास सातभाई, अशोक मुर्तडक, यतीन वाघ, ॲड. जयंत जायभावे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, शरद आहेर, विनायक खैरे, विश्वास ग्रुपचे संचालक विश्वास ठाकूर, सी. एल. कुलकर्णी, मामा राजवाडे, गुरमित बग्गा, संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

अभंगांनी श्रोत्यांमध्ये स्वरांचा ज्वर

विठु माऊलीवरील पंडिता स्मीती मिश्रा यांनी गायिलेल्या ‘बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल’ या अभंगाने श्रोते विठू माऊलीच्या भक्तीत तल्लीन झाले. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ गाण्याने स्मीती मिश्रा यांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.

डीएनमध्ये नाशिकच, संस्कृती टिकविणे कर्तव्य : डॉ. कैलास कमोद

पिंपळपारावर २५ वर्षात संस्कृती नाशिक पाडवा पहाटच्या निमित्ताने सरस्वती ओघावली आहे. राग, भैरव, ठुंबरीचा आनंद संस्कृती नाशिकच्या माध्यमातून नाशिककरांना मिळत आला आहे. रक्त तपासले तर माझ्या डीएनएमध्ये नाशिकच सापडेल, संस्कृती नाशिकने केलेला सन्मान आईकडून मिळालेली मायेची शाल असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. कैलास कमोद यांनी केले.

डॉ. कमोद म्हणाले, नेहरू चौकातील पिंपळपाराच्या एक किलोमीटर परिघात नाशिकची संस्कृती पसरली आहे. धार्मिक संस्कृती, कुंभमेळ्याने नाशिकच्या संस्कृतीमध्ये नेहरू चौकाचे महत्त्व आहे. नाशिकची संस्कृती जपण्याचे काम संस्कृती नाशिक संस्था करीत आहे. शहराचा विकास होत असताना नाशिकचे मुळ रहिवाशांचे अस्तित्व टिकविणे काम आहे. शहराचा विकास रोखू शकत नसलो पण विकास करताना संस्कृती बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. शाहू खैरे यांनी २५ वर्षातील रौप्य महोत्सवी पाडवा पहाटच्या आठवणी उजळविल्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT