Sagar Muthal burying rotten onion in barn with help of JCB
Sagar Muthal burying rotten onion in barn with help of JCB esakal
नाशिक

Onion Crisis : अवघ्या 10 दिवसांत सडला भिजलेला कांदा; JCBच्या सहाय्याने उकिरड्यात गाडण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

Onion Crisis : सततच्या अवकाळी पावसाने बळीराजाला जेरीस आणले आहे. वडगाव पिंगळा (ता. सिन्नर) येथील युवा शेतकरी सागर चंद्रभान मुठाळ यांचा दहा दिवसांपूर्वी काढलेला उन्हाळ कांदा या पावसात भिजल्याने खळ्यावरच सडला.

त्यामुळे कुटूंबियांच्या पानावलेल्या डोळ्यादेखत हा सडलेला कांदा जेसीबीच्या सहाय्याने उकिरड्यात गाडावा लागला. (Soaked onion rotten in just 10 days Excavation time with JCB by farmer nashik news)

यंदा अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील गव्हापासून ते उन्हाळी कांदा काढणीच्या हंगामात धुमाकूळ घालून शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. सध्या उन्हाळ कांदा काढणीच्या हंगामातदेखील पाऊस सुरू आहे.

अशा पार्श्‍वभूमीवर वडगाव पिंगळा येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून, लाख मोलाचे नकदी पिक जमिनीत खड्डा करून गाडावे लागले. यंदा फेब्रुवारीपासूनच अवकाळी पावसाने संपूर्ण रब्बी हंगाम नेस्तनाबूत केला आहे.

त्यावेळी काढणी आलेले गहू गारांच्या तडख्यात सापडले. त्यांना गारा, पाऊस अन् सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतात उभे असलेले गहू पिक आडवे झाले. काही ठिकाणी गव्हाचा रंग गेला. तर काही गहू आंबट ओले काढल्याने खळ्यातच उबट झाले आहे.

सिन्नर तालुक्यातील विविध गावांत सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. यंदा उशीरा कांदा लागवडीचे प्रमाण वाढले आहे. त्याच कांद्याची सध्या काढणी सुरू आहे. अवकाळी पावसाचे पाणी उन्हाळी कांद्याच्या पातमध्ये गेल्याने कांदा देठापासून सडण्यास सुरवात झाली आहे.

त्यातच भाव नसल्याने उन्हाळी कांदा साठवणूकीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र, लाखो रूपये खर्चून हातातोंडाशी आलेले कांदा पिक खळ्यातच सडत आहे. सागर मुठाळ यांनी दहा दिवसांपूर्वी चार ट्रॅक्टरभर उन्हाळ कांदा शेतीतून काढला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

उत्पादनात घट झालेली असतानाही त्यांनी निराशा न होता उन्हाळी कांदा साठवणूक करण्याचा निर्णय घेतला. नाफेडने कांदा खरेदी सुरू केली की कांदा भाव वाढतील, अशी भोळी आशा बाळगून कांदा खळ्यावर आणला.

पण, अवकाळी पावसाने उन्हाळी कांद्याचा पिच्छा सोडला नाही. मार्चमध्ये झालेला पाऊस उन्हाळी कांद्यासाठी त्रासदायक ठरला आहे. रविवारी (ता. ७) सकाळी मुठाळ परिवारास खळ्यात सडलेला कांदा दिसला.

त्यामुळे ते गर्भगळीत झाले. सडलेल्या कांद्याचा उग्र दर्प येत असल्याने तो जेसीबीच्या सहाय्याने उकिरड्यात गाडण्याचा निर्णय घेतला अन्‌ कुटूंबातील सदस्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांसमोर चार ट्रॅक्टर कांदा जमिनीत गाडून टाकावा लागला.

"शेतात काढलेला कांदा दहा दिवसांत सडला. मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी कांद्याच्या गाभ्यात शिरले. कांदा काढणीनंतर टिकेल, असे वाटले होते. पण, तो लगेच सडला. जेसीबीच्या सहाय्याने चार ट्रॅक्टर कांदा उकिरड्यात गाडला आहे."

-सागर चंद्रभान मुठाळ, युवा कांदा उत्पादक शेतकरी, वडगाव पिंगळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

IPL 2024 SRH vs GT Rain : हैदराबाद - गुजरात सामन्यात पावसाची शक्यता... सीएसके अन् आरसीबीला फुटला घाम

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

Amit Shah : ..म्हणून PFI वर बंदी घातली! बिहारमध्ये गृहमंत्री अमित शाहांचा खुलासा; म्हणाले...

SCROLL FOR NEXT