peth farmers photo 1.jpg 
नाशिक

खरेदी करण्यात दंग.. कोरोना विसरले नागरिक.. सोशल डिस्टन्सिंग चक्क वाऱ्यावर!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / पेठ : कोरोनामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बाजारपेठ बंद होती. सोमवार (ता. 8) पासून शासनाच्या आदेशान्वये बाजारपेठ खुली करण्यात आली. खरीप हंगाम आणि पावसाळ्याची खरेदीसाठी शेतकरी, शेतमजुरांनी येथे प्रचंड गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. 

गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंग वाऱ्यावर 

तालुक्‍यातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील बहुतांश घरे कौलारू आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नवीन कौले टाकणे, प्लॅस्टिक कागद टाकणे आदी कामे आदिवासी बांधव दरवर्षी करतात. यंदा मात्र पावसाळा सुरू झाला तरीही लॉकडाउनमुळे त्यांना घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे लॉकडाउन शिथिल होताच नागरिकांनी पेठ शहरात खरेदीसाठी गर्दी केली. बाजारपेठेत कौले, पत्रे, प्लॅस्टिक कागद, काथ्या, छत्री, पावसाळी चप्पल, गम बूट आदी वस्तू खरेदीची लगबग होती. यासोबतच खरिपाची घाईगर्दी असल्याने शेतकरी शेतीअवजारे फावडे, टिकाव, विळी, कुऱ्हाड, नांगर फाळ, लोखंडी सारळी, दोरखंड, बैलजोते, सऊळ, दुसर आदी खरेदीची दुकाने गर्दीने फुलून गेली. 

लॉकडाउनमुळे बोंबीलची आवक कमी 
तालुक्‍यात चार महिने सतत पाऊस पडत असल्याने त्यात शेतीची कामे सुरू होत असल्यामुळे शेतकरी शेतमजुरांस शहरात येणे शक्‍य होत नाही. त्यामुळे आदिवासी बांधव चार महिन्यांचा बोंबील, सुकड, झिंगा आणि खारामासा यांची खरेदी मोठ्या प्रमाणात करतात. मात्र लॉकडाउनमुळे परराज्यांतून येणारा हा माल दळणवळणांच्या असुविधेमुळे न आल्याने मागणीत वाढ असली तरी पुरवठा कमी होत असल्याचे बोंबील व्यावसायिकांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Shahi Tukda Recipe: सणासुदीला बनवा लज्जतदार स्वीट डिश; कुरकुरीत ब्रेड अन् केशर-रबडीयुक्त शाही तुकडा!

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

SCROLL FOR NEXT