Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik News: ZP सेसच्या नियोजनात समाजकल्याणची आघाडी! घरकुल, जोडप्यास अनुदानासह वाहन खरेदी योजना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या स्वनिधी (सेस) नियोजनात समाजकल्याण विभागाने आघाडी घेतली आहे.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील ४.१२ कोटींच्या निधीचे नियोजन केले असून, यातून दिव्यांगांसाठी घरकुल योजना, दिव्यांग जोडप्यास अनुदान आणि चारचाकी वाहन खरेदी केली जाईल.

सर्वसाधारण सभेत नियोजनास मंजुरी मिळाली असून, तालुका स्तरावरून लाभार्थी यादी मागविण्यात आली आहे. सप्टेंबरअखेर लाभार्थी निश्चित केले जाणार असल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले. (Social welfare in the planning of ZP Cess Gharkul vehicle purchase scheme with subsidy for couple Nashik News)

जिल्हा परिषदेच्या सेस निधीचे नियोजन केले जाते. यात एकूण नियोजनाचा २० टक्के निधी राखीव, पाच टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव असतो. यातून वैयक्तिक व सामूहिक योजना राबविण्यात येतात.

यंदा २० टक्के राखीवमधून २.५५ कोटी निधी प्राप्त झाला आहे. यात ११७ दिव्यांग लाभार्थ्यांस घरकुल योजना राबविली जाईल. पाच दिव्यांग जोडप्यास ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

पाच टक्के राखीव निधीतून दिव्यांगांसाठी चारचारी वाहन खरेदी केले जाईल. यात यंदा १२५ दिव्यांग लाभार्थ्यांना हे वाहन दिले जाणार आहे. गत आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत या योजनांना तांत्रिक मान्यता मिळाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

लाभार्थी निश्चित करण्याकरिता तालुकास्तरावरून यादी मागविण्याचे काम सुरू आहे. सर्व तालुकास्तरावर याद्या प्राप्त झाल्यावर सप्टेंबरअखेर लॉटरी पद्धत राबवून लाभार्थी अंतिम केले जातील.

सेस निधी नियोजन लवकर करावे, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले होते. त्यानुसार दायित्व निश्‍चित करीत नियोजन करण्यात आले आहे.

लाभार्थी अंतिम करून निधी तत्काळ वर्ग करण्याची कार्यवाही केली जाईल, असे समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT