Kazi Gadhi Latest marathi news esakal
नाशिक

Nashik : काझी गढीची माती ढासळली

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : गेल्या चार दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे (Constant Rain) काझी गढीची माती मोठ्या प्रमाणावर धुतली गेली. शनिवार (ता. १६) रात्री दहाच्या सुमारास गढीची माती ढासळून तुटक्या बंद घराच्या भिंतीचा भाग कोसळला.

काझी गढीचा बहुतांशी भाग धोकादायक झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथील घरांचा भाग कोसळण्याच्या घटना घडत असतात. (soil of kazi Garhi collapsed nashik Latest Marathi News)

काही रहिवाशांनी तेथून कायमस्वरूपी स्थलांतर केले आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, असे रहिवासी मात्र अद्यापही या ठिकाणी जीव मुठीत घेऊन वास्तव्यास आहे. गढीची माती पावसाळ्यात धुतली जात असल्याने तो भाग धोकादायक झाला आहे.

शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसाने रात्री दहाच्या सुमारास गढीच्या काठावरील माती ढासळली. त्यामुळे त्याठिकाणी असलेल्या बंद घराच्या तुटलेल्या भिंतीचा काही भाग खाली कोसळला. पश्चिम विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.

कोसळल्या भागास लागून असलेल्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे सांगितले. रहिवाशांनी मात्र कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त केला. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास माती ढासळण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांनी गढीच्या पायथ्याशी नदीपात्रास लागून असलेला रस्ता बॅरिकेटिंग करून वाहतुकीसाठी बंद केला.

नगरविभागाचे श्री. जोपळे आणि बांधकाम विभागाचे अरुण मोरे यांनी दोन्ही ध्वनीक्षेपणाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला. शिवाय गढीवरील आणि पायथ्याशी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT