solve all issues including Maratha reservation nashik marathi news
solve all issues including Maratha reservation nashik marathi news 
नाशिक

...अन्यथा मोठे आंदोलन छेडणार; मराठा समन्वय समितीचा इशारा

संतोष विंचू

नाशिक/येवला : मराठा समाजाच्या महत्वाच्या विषयांकडे सरकार व मंत्री मंडळातील कोणीही जाणीवपूर्वक लक्ष घातलेले नाही, तसेच मराठा समाजाच्या प्रश्नांकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या महत्वाच्या मागणीनुसार सरकारने अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यभर मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मराठा समन्वय समितीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.  

आरक्षणाबाबत चिंता वाढली

समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे देण्यात आले आहे. मराठा आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून त्याबाबत एक दोन वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या बैठकामध्ये जे शब्द देण्यात आले तसे न घडता वेगळेच घडत आहे. यामुळे मराठा समाजामध्ये आरक्षणाबाबत मोठी चिंता वाढली आहे.न्यायालयात आरक्षणाचा मुद्दा टिकून राहील यासाठी सरकारने या प्रश्नांकडे लक्ष वेधावे,आरक्षणाची सरकारने काळजी घ्यावी अन्यथा मोठे आंदोलन छेडणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

इतरही विविध मागण्या

मंत्रिमंडळ समितीच्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे यांची नेमणूक करावी समाजाशी निगडीत पदांवर विजय वेडीट्टीवर यांना ठेऊ नये, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारने उच्च न्यायालयात लक्ष घालावे व न्यायप्रक्रियेला गती दयावी, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखाची मदत देऊन कुटुंबातील बएका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी आदी 18 मागण्या निवेदनात केली आहे.

निवेदन देते समयी येथील युवराज पाटोळे, सागर नाईकवाडे, आदित्य नाईक, विशाल काथवटे, विवेक चव्हाण, किशोर भुजाडे, सचिन घायाळ, अक्षय तांदळे, तुषार नाईकवाडे, नवनाथ ढोपरे, विशाल गायकवाड,अमोल पाबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 


संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT