ashok mahajan mohdari.jpg 
नाशिक

अखेर गुढ उकलले! घनदाट घाटात आढळलेल्या संशयास्पद प्रकाराचा पोलीसांनी लावला छडा.. असा रचला प्लॅन

विनोद बेदरकर

नाशिक :  मोहदरी घाटातील वन विभागच्या हद्दीतून सरदवाडीचे कामगार पोलिसपाटील पंढरीनाथ शिरसाठ त्या बाजूने जात असताना त्यांना काहीतरी संशयास्पद अन् विचित्र प्रकार आढळल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. याच वेळी अशोक महाजन यांचे नातेवाईकदेखील सिन्नरला त्यांचा शोध घेत आले असता पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी महाजन यांच्या नातेवाइकांना खबर दिली. यानंतर पोलीसांनी या गोष्टीचा छडा लावल्यानंतर अखेर गुढ उकललेच...वाचा सविस्तर प्रकार...

अशोक महाजन खून प्रकरण : पोलीसांनी लावला छडा

श्रमिकनगर (सातपूर) येथील अशोक महाजन १७ जुलैला सकाळी नऊला घरातून सिन्नरला जाण्यासाठी बाहेर पडले.रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. १८ जुलैला सायंकाळी त्यांच्या पत्नी आशा महाजन यांनी सातपूर व १९ जुलैला सिन्नर पोलिस ठाण्यात पती हरविल्याची तक्रार नोंदविली. १९ जुलैला सायंकाळी सिन्नर पोलिसांना नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटाच्या रस्त्याच्या कडेला कुजलेला मृतदेह आढळला. महाजन यांच्या कुटुंबियांनी तो ओळखला. शव विच्छेदनानंतर २० जुलैला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास केला. महाजन यांनी सिन्नर येथून वाघ नावाच्या व्यक्तीकडून घेतलेले १८ हजार रुपये, मोबाईल, दुचाकीची चावी गायब होती. तसेच ओळख पटू नये यासाठी दुचाकीच्या नंबर प्लेटची छेडछाड करण्यात आली होती. महाजन यांच्या समवेत आणखी एक तरुण होता असे वाघ यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने संशयिताचा तपास सुरु केला. 

 पैशासाठीच दगडाने ठेचून मोहदरीत फेकला मृतदेह 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर एमआयडीसी, अशोक नगर वाईन शॉप सिन्नर टोलनाका आदी ठिकाणचे सीसी टीव्ही फुटेज तपासले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयिताचा अशोकनगर भागात गेल्या दोन दिवसापासून तपास सुरु होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल वाघ, उपनिरीक्षक प्रभाकर पवार, हवालदार प्रकाश चव्हाणके, पोलिस नाईक प्रितम लोखंडे, हेमंत गिलबिले, निलेश कातकाडे, किरण काकड, संदीप लगड, प्रदीप बहिरम आदींनी सापळा रचून सोमवारी (ता.२७) संदीपला त्याच्या बहुले मळ्यातील घरी ताब्यात घेतले. सिन्नरला जाण्यापुर्वी महाजन यांच्याकडे खर्चाला पैसे नव्हते. त्यामुळे मी सातशे रुपये उसने दिले. पैसे नंतर देतो असे सांगितल्याने आमच्यात वाद झाला. झटापट झाली. या वादातून दगड उचलून त्याच्या डोक्यात मारला. त्याच्या खिशातील रक्कम काढून छोटा हत्ती वाहनातून नाशिकला पळून आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election: “निवडणूक लढवता? मग हे लिहून द्याल का?” संकल्पनामा फेल झाला तर राजकारणालाही ब्रेक!

Malegaon News : तुकाराम मुंडेंच्या आदेशाला केराची टोपली; मान्यता रद्द असूनही मालेगावात अंधशाळा सुरूच

Union Budget 2026 : १ फेब्रुवारी रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार? शेअर बाजारही सुरू राहणार का?

मुस्ताफिजूर रहमानच्या हकालपट्टीचा राग बांगलादेशने भारतीय तरुणीवर काढला; ती म्हणाली, मला काही बोलायचे नाही, जय हिंद!

'अवैध धंदे बंद करताना कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मागे हटणार नाही'; नीतेश राणेंचा स्पष्ट इशारा

SCROLL FOR NEXT