chhagan bhujbal.jpg 
नाशिक

''शासन व यंत्रणेचे नाव खराब करण्यासाठी काही टीकाकार कामाला लागलेय''

सकाळवृत्तसेवा

नाशिक :`कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर जीव धोक्‍यात घालून रेशन दुकानदार, त्यांचे कर्मचारी, यातील सर्व यंत्रणा अतिशय कठीण स्थितीत काम करते आहे. सामान्यांना जीवनाश्‍यक वस्तूंचा पुरवठा करीत असून त्यांना मनापासून धन्यवाद श्री. भुजबळ यांनी केले. मात्र, काही टीकाकार आणि टीकेची संधी शोधणारी मंडळी शासन व यंत्रणेचे नाव खराब करण्यासाठी कामाला लागली आहे. त्यांच्यापासून सावध रहा. गरजूंना धीर देण्याचे, पुरवठा प्रामाणिकपणे सुरु ठेवावा, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

सात कोटी लोकांना धान्य पुरवठ्याचे उद्दीष्ट

श्री. भुजबळ म्हणाले, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ असा साडे तीन कोटी नागरीकांना वाटप केले आहे. राज्यातील सात कोटी लोकांना धान्य पुरवठ्याचे उद्दीष्ट आहे. हे वाटप केंद्रात यापूर्वीचे लोकशाही आघाडी सरकार सत्तेत असतांना त्यांनी केलेल्या फुड सिक्‍युरीटी ऍक्‍टनुसार केलेल्या 1.70 कोटी शिधापत्रिकाधारकांना होते आहे. त्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारने स्विकारलेल्या धोरणात यातील काहींना वगळले. आपण मात्र त्यांनाही दिलासा देत आहोत. केंद्र शासनाने आपल्याला जे धान्य उपलब्ध करुन नागरिकांना पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या आहेत, त्यावर काम सुरु आहे. तो निर्णय झाला अन्‌ लगेच पुरवठा सुरु असे होत नाही. त्यावर पत्रव्यवहार, धान्याची उपलब्धता, अन्न महामंडळाच्या गुदामातून त्याचा पुरवठा आदींची पूर्तता करावी लागते. येत्या चार पाच दिवसात ते काम आपल्याकडे सुरु होईल. विदर्भात ते आधीच सुरू झालेले आहे.

राज्यात पंच्चावन्न हजार स्वस्त धान्य दुकाने

ते म्हणाले, "कोरोना' ग्रस्तांच्या उपचारासाठी डॉक्‍टर्स, नर्स, वॉर्डबॉय, पोलिस, प्रशासनाचे कर्मचारी, सार्वजनिक पुरवठा विभागाच्या दुकानांतील कर्मचारी अत्यंत दबावाखाली मात्र आपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत. त्यांना पुरवठा करणारे ट्रक्‍सचे चालक, हमाल हे सगळे कौतुकास पात्र आहेत. त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संबंधीत खात्याच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार सर्व पुरवठा व मदतकार्य सुरु आहे. मात्र काही टिकाकार, टिकेची संधी शोधणारे या यंत्रणेचे नाव खराब करण्यासाठी कामाला लागले आहेत. काल रावेर येथील एका दुकानदाराने जास्त पैसे घेतल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्याचा परवाना निलंबीत केला आहे. पोलिसांत तक्रारी दाखल झाली आहे. मात्र राज्यात पंच्चावन्न हजार स्वस्त धान्य दुकाने आहेत. यातील एकाने जरी असे केले तरी सबंध यंत्रणेचे नाव खराब होते. अशा स्थितीत आपली जबाबदारी वाढली आहे. आपणच नागरीकांना सर्व समजावून सांगीतले पाहिजे. दक्ष राहिले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

Tipu Sultan Heirs : टिपू सुलतानचे वंशज चक्क चालवतात रिक्षा, सोन्या चांदीत लोळणारे राजघराणे एक-एक रुपयाला झालेत लाचार, आता कुठे आहेत

Latest Marathi News Live Update : मद्यधुंद तरुणांकडून दुचाकींची तोडफोड,घटना CCTV मध्ये कैद

अनफेअर एव्हिक्शन ! बिग बॉस मराठीला संकेत पाठकचा अलविदा; चाहते संतापले "स्क्रिप्टेड शो.."

Kankavli Firing Case : कणकवलीत गोळ्या झाडून बांधकाम व्यावसायिकाचा खून, अवघ्या २१ वर्षीय तरूणाने केला खून; खुनाचे नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT