son killed mother.jpg 
नाशिक

...अन् ज्या आईच्या उदरातून जन्म घेतला, त्यावरच 'त्याने' घाव घातला...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (ता. सुरगाणा) सुभाषनगर, सारणेआवण येथील देवीदास लक्ष्मण गावित (वय 32) या तरुणाने दारूच्या नशेत जन्मदात्या आईच्याच जीवावर उठला. त्याने रागाच्या भरात स्वत:च्याच आईच्या डोक्‍यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना समोर आली असून मातृप्रेमाला काळिमा फासणारा हा नराधमाने खून केल्याची
कबूली दिली. 

अशी आहे घटना

सोनीबाई लक्ष्मण गावित (60) असे या अभागी मातेचे नाव असून, सोमवारी (ता.17) सायंकाळी सहाच्या सुमारास त्या शेतात काम करीत होत्या. त्या कामात व्यस्त अस तांना देवीदासने मागून येऊन मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या मानेवर, गालावर, पोटावर कुऱ्हाडीने वार केले. कुऱ्हाडीच्या वाराने ती माता रक्तभंबाळ होऊन खाली कोसळली.
सोनीबाई यांनी जागेवरच जीव सोडला. यासंदर्भात देवीदासची पत्नी सरला यांनीच पोलिसांत तक्रार दिली. त्यात म्हटले आहे, की मासिक पाळीचा त्रास असल्याने व आजारपणामुळे त्या घरीच झोपून असायच्या. त्यावेळी पती देवीदास नेहमीच दारूच्या नशेत त्यांच्या आईला शिवीगाळ करून नेहमी भांडत असे. याच भांडणाचा राग डोक्‍यात घेऊन मंगळवारी देवीदासने रागाच्या भरात दारूच्या नशेत कुऱ्हाडीने वार करून आईचा खून केला. 

याबाबत माहिती मिळताच तातडीने तपासाची सूत्रे फिरवीत पोलिस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक सागर नांद्रे यांनी सोमवारी रात्री उशिरा देवीदासला सुभाष नगर शिवारातून अटक केली. त्यावेळी त्याने आईच्या डोक्‍यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT