wheat farm.jpg
wheat farm.jpg 
नाशिक

रब्बीमध्ये गहू अन्‌ मक्‍यासह हरभरा लागवडीची "शंभरी'' पार! 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : अवकाळीच्या जोडीला लांबलेल्या परतीच्या पावसामुळे पाण्याची उपलब्धता असल्याने राज्यात रब्बीमध्ये गहू, मका, हरभरा लागवड सर्वसाधारण क्षेत्राहून अधिक झाली आहे. खरिपाचे क्षेत्र रब्बीकडे वर्ग झाल्याने ही स्थिती तयार झाली आहे. 

ज्वारीची पेरणी 68 टक्‍क्‍यांवर

गव्हाची 106, मक्‍याची एक हजार 10, तर हरभऱ्याची 146 टक्के क्षेत्रावर लागवड झाली. खरिपाचे क्षेत्र रब्बीकडे वर्ग झाल्याने ही स्थिती तयार झाली आहे. दुसरीकडे मात्र, ज्वारीची पेरणी 68 टक्‍क्‍यांवर पोचू शकली. राज्यात 96 टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या उरकल्या आहेत. ज्वारीचे सरासरी क्षेत्र 26 लाख 78 हजार 513 हेक्‍टर असून, त्यांपैकी 18 लाख 18 हजार हेक्‍टरवर पेरण्या झाल्या. गव्हाचे सरासरी क्षेत्र 10 लाख 14 हजार हेक्‍टर असून, प्रत्यक्षात 10 लाख 71 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. 

रब्बीची 54 लाख 58 हजार हेक्‍टरवर पेरणी

मक्‍याचे सव्वादोन लाख हेक्‍टर सरासरी क्षेत्र असले, तरीही प्रत्यक्षात दोन लाख 27 हजार हेक्‍टरवर लागवड पूर्ण झाली. 14 लाख 90 हजार सरासरी क्षेत्र हरभऱ्याचे आहे. प्रत्यक्षात 21 लाख 78 हजार हेक्‍टरवर लागवड झाली. करडई, जवस, तीळ, सूर्य फुलाची लागवड सरासरीच्या तुलनेत खूप कमी म्हणजे, 25 टक्के झाली आहे. रब्बीचे राज्यातील सर्वसाधारण क्षेत्र 56 लाख 93 हजार हेक्‍टर इतके असून, 54 लाख 58 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. 

विभागनिहाय रब्बीची स्थिती (आकडे हेक्‍टरमध्ये)  

विभागाचे नाव सरासरी क्षेत्र पेरणीचे क्षेत्र 
कोकण 29 हजार 872 25 हजार 912 
नाशिक 4 लाख 30 हजार 4 लाख 44 हजार 
पुणे 17 लाख 81 हजार 11 लाख 60 हजार 
कोल्हापूर 5 लाख 6 हजार 4 लाख 26 हजार 
औरंगाबाद 7 लाख 72 हजार 9 लाख 13 हजार 
लातूर 11 लाख 14 हजार 13 लाख 47 हजार 
अमरावती 6 लाख 46 हजार 7 लाख 40 हजार 
नागपूर 4 लाख 11 हजार 3 लाख 99 हजार 

लष्करी-घाटे अळीचा प्रादुर्भाव 

ज्वारीचे पीक पोटरी, फुलोरा, दाणे भरणे, पक्वता अशा वेगवेगळ्या टप्प्यात आहे. हरभरा फुलोरा ते घाटे भरण्याच्या आणि पक्वतेच्या अवस्थेत आहे. गव्हाची कांडी धरण्याबरोबर ओंब्या लागण्याची अवस्था आहे. करडई व सूर्यफूल वाढ ते फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. मक्‍याला फुलोरा लागलेला आहे. शिवाय कणसे लागणीची अवस्था आहे. या पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. याशिवाय राज्यात काही ठिकाणी मका व ज्वारीवर लष्करी, तर हरभऱ्यावर घाटेअळीसह मररोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT