Pachore Vani (Ta. Niphad) A soybean crop that has turned yellow due to adverse weather conditions. esakal
नाशिक

Soya Bean Crop Crisis: कीडरोग, बुरशीने पोखरले सोयाबीन; यंदा उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता

एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा खंड पडला. याच कालावधीत पांढऱ्या माशीचा प्रकोप वाढल्याने सोयाबीनवर पिवळ्या मोझॅकचा प्रादूर्भाव वाढला. तो शेतकऱ्यांनी नियंत्रणात आणला.

मात्र, त्यानंतर वाढलेले दिवसाचे तापमान, जमिनीतही उष्णतामान अधिक होती. हीच परिस्थिती खोडकूज, मुळकूज, काळीकुज आणि शेंगावरील करपा या बुरशीजन्य रोगाच्या वाढीस पोषक ठरली.

यंदा कीडरोग आणि बुरशीने सोयाबीनचे अर्ध्याहून अधिक क्षेत्र पोखरून काढले. जवळपास १५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले. कीडरोग, बुरशीने यंदा उत्पन्नात मोठी घट होणार असल्याची शक्यता कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. (Soya Bean Crop Crisis Soybeans Infested With Pests Fungi possibility of big decrease in income this year nashik)

निफाड तालुक्यात खरीप हंगामात मका, सोयाबीनचे पीक घेतले जाते. सोयाबीन नगदी पीक आहे. गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात दरवर्षी थोडीफार वाढ होत चालली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात २२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. सुरवातीला पाऊस चांगला झाला. त्यामुळे पीक चांगल्या वाढीच्या अवस्थेत होते. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने खंड दिला.

त्यानंतर तापमान वाढले. वातावरणही बदलून गेले. याचा परिणाम सोयाबीन पिवळे पडण्यास सुरवात झाली. गोदाकाठ परिसरात सोयाबीन सुकून वाळायला लागल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या.

त्यावरून कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांध्यावर भेट देऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. या पाहणीत सोयाबीनवर पिवळ्या मोझॅकचा प्रादूर्भाव दिसून आला. कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्या. त्यामुळे बऱ्यापैकी हा प्रादूर्भाव आटोक्यात आला.

पिवळ्या मोझॅक आटोक्यात येत असताना, पावसाने वेग पकडला. त्यामुळे चारकोल रॉट, रायझोक्टोनिया करपा या रोगाच्या वाढीस पोषक वातावरण झाले. वातावरणाच्या बदलामुळे संवेदनशील वाण बळी पडले.

काही भागात सुरवातीच्या अवस्थेत खोडमाशी, चक्रभुंगा या कीडीचा प्रादूर्भाव वाढला. यामुळे सोयाबीनचे खोड पोखरल्या जाऊन जमिनीतील अन्नद्रव्याचे वहन कमी झाले. झाडे अशक्त होऊन शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत पाने पिवळी पडली.

काही ठिकाणी पेरणी करताना बियाणे जास्त वापरल्यामुळे झाडांमध्ये अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा होऊन झाडे अशक्त झाली. निफाड तालुक्यात २२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली.

मात्र, कीडरोग, बुरशीने तब्बल १५ हजारांहून अधिक क्षेत्र बाधित झाले. प्रामुख्याने गोदाकाठ, कसबे सुकेणे, पालखेड, रानवड भागात सोयाबीनच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदा उत्पन्नात मोठी घट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT