Soyabean Sakal
नाशिक

बहरलेल्या सोयाबीनवर सुकवा; शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा

दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : वीस दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने डोळे वटारले असून, पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जमिनीत ओलावा असल्याने सकाळी टवटवीत दिसणारे पीक दुपारी माना टाकत आहे. पूर्व भागात तर पीक करपण्याच्या मार्गावर आहे. सर्वाधिक अपेक्षा असलेले सोयाबीन पीकही सुकू लागल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. आकाशात नुसते काळेकुट्ट ढग येत असून, पाऊस कधी पडतो, असा यक्षप्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

या वर्षी सुरवातीला चांगला पाऊस झाला. त्या पावसाच्या भरवशावर मका, सोयबीनच्या पिकांची पेरणी झाली. तब्बल दहा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत सोयाबीनच्या दराने यंदा झेप घेतल्याने निफाड तालुक्यात सोयाबीनची १६ हजार हेक्टरवर, तर मका सहा हजार ७०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. अनुकूल वातावरणामुळे सोयाबीन पिकाची जोमदार वाढ झाली आहे. सोयाबीनचे पीक शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये हिरवे स्वप्न साकारत असताना २० दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना डोळ्यासमोर चांगली बहरलेली पिके सुकताना पाहण्याची वेळ आली आहे. सध्या फुलोरा अवस्थेत असलेल्या सोयाबीनला पाणी देण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहे.

पावसाने दडी मारल्याने निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. आठ दिवसांत पाऊस आला नाही, तर उत्पन्न घटीचा सामना करावा लागणार आहे. निफाड तालुक्यात आतापर्यंत २५० मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. पण, २० दिवसांचा मोठा ‘ब्रेक’ पावसाने घेतला आहे. आकाशात रोज आभाळ येते आणि सायंकाळपर्यंत आकाश मोकळे होते. काहीवेळा पुरता रिमझिम पाऊस येतो. यामुळे पिके धोक्यात आली आहेत.

पाऊस नसल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. टोमॅटोवर रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सोयाबीनची पाने करपू लागली आहे. रोगांशी झुंज देण्यासाठी महागड्या कीटकनाशकांचा वापर करावा लागत आहे. यात शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

पावसाअभावी खरीप पिकांची वाढ थांबली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार चार दिवसांत पावसाचे पुनरागमन झाल्यास पिके पुन्हा जोमाने बहरतील.

- बी. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT