soybean price
soybean price 
नाशिक

सोयाबीनची ऐतिहासिक उसळी; उच्चांकी भावाचा शेतकऱ्यांचा फायदा कमीच

एस. डी. आहिरे

पिंपळगांव बसवंत (जि. नाशिक) : कॅनडामध्ये दुष्काळसदृश स्थितीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट व भारतातील सोयोबीन संपल्याने विक्री दराकडे वाटचाल सुरू आहे. तब्बल दहा हजार रूपये प्रतिक्विंटलच्या जादुई बाजारभावाकडे सोयाबीनची वाटचाल सुरू आहे. सध्या नऊ हजार पाचशे रूपयांचे दर आहे, पण शेतकऱ्यांकडे सोयाबीन संपल्यात जमा आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावाच्या गगनभरारीचा लाभ शेतकऱ्यांना होतांना दिसत नाही. (Soybean prices reached a historic high in market)

पालखेड उपबाजारात सोयाबीनची आवक थांबली आहे. लासलगांव बाजार समितीत अवघी 99 क्विंटल आवक होऊन दर किमान 3500, कमाल 9500, सरासरी 9301 असा उच्चांकी राहिला. काही महिन्यापासून सोयाबीनच्या दरात मोठी उसळी येत आहे. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत सोयाबीने अक्षरशः सोन्याचा भाव खाल्ला. तब्बल साडे नऊ हजार रूपये प्रतिक्विंटलची गगनभरारी घेतली.

निफाड तालुक्यात लासलगाव व पालखेड मिरचीचे येथे सोयाबीनची मोठी बाजारपेठ आहे. हंगाम सुरू असताना दररोज किमान 30 हजार क्विंटलची आवक दोन्ही ठिकाणी होते. यंदा हंगामाच्या प्रारंभी अर्जेटिनासह परदेशातील कमी उत्पादनामुळे दर साडे चार हजार रूपयांच्या पुढे राहिले. सोयाबीनच्या हंगामाचा श्रीगणेशा आकर्षक दराने झाला. शिवाय तेजीचा वारू उधळत राहीला. पशूखाद्य व तेल निर्मितीसाठी मागणी वाढत गेली. त्यात तुलनेत पुरवठा मोठ्या प्रमाणात घटल्याने भाव सातत्याने वाढ होत गेले. दोन महिन्यापुर्वी सात ते साडे सात हजार रूपये प्रतिक्विंटल दर स्थिर होते.

खाद्यतेलाचे दर वाढणार?

मंगळवारी लासलगाव बाजार समितीत नऊ हजार पाचशे रूपये क्विंटल असा सोयाबीन विक्रमी भाव मिळाला. इतिहासात सोयाबीनचा सर्वाच्च दर आहे. हे दर दहा हजार रूपयां पर्यत झेपावु शकतात,असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन सोयाबीन बाजारात येई पर्यंत दरातील चमक कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. सोयाबीन दरवाढीचा फायदा तेल उत्पादक कंपन्यांनी उठविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सोयाबीनच्या दराच्या तेजीचे कारण पुढे करून तेलाचे दर वाढविण्याचा डाव कंपन्यांनी आखला आहे.विशेष म्हणजे तेल उत्पादक कंपन्यांनी जुन्या दरात सोयाबीनची खरेदी केली आहे.

यंदा उगवण क्षमतेची तक्रार नाही…

निफाड तालुक्यात यंदा १८ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी सोयाबीन उगवले नसल्याने दीड हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. यंदा मात्र अजूनही तक्रारी आलेल्या नाहीत. खरिप पेरणीपूर्वी तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. सोयाबीन पेरणीसाठी बीज उगवण क्षमता तपासणी करून पेरणी करावी, घरचे बियाणे वापरावे यासह पेरणी संदर्भात महत्त्वाच्या विषयासंबंधी जनजागृती करण्याल आली.

(Soybean prices reached a historic high in market)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

SCROLL FOR NEXT