Nashik Neo Metro project News
Nashik Neo Metro project News esakal
नाशिक

Metro Neo Project : ‘मेट्रो निओ’ साठी चेहेडी, गंगापूर येथे जागा; ‘महामेट्रो’ कडून मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरामध्ये प्रस्तावित मेट्रो निओ प्रकल्पासाठी (Metro Neo Project) सिटीलिंक बससेवेचा डेपो असलेल्या चेहेडी तसेच गंगापूर येथे महामेट्रो कंपनीने महापालिकेकडे जागेची मागणी नोंदविली आहे. (space for Metro Neo project at Chehdi Gangapur nashik news)

प्रकल्पाला गती देण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तातडीने भूसंपादन व मिळकत विभागाला जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

महामेट्रो राज्य शासन व केंद्र शासनाकडून नाशिकमध्ये देशातील पहिला टायर बेस मेट्रो निओ प्रकल्प साकारला जाणार आहे. २०२० मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात या प्रकल्पाची घोषणा केली. २१६५ कोटी रुपये प्रकल्पासाठी खर्च येणार असून, २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.

परंतु अद्यापही केंद्रीय कॅबिनेट मंत्री मंडळात या प्रकल्पाचा प्रस्ताव पडून आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील भाजपच्या कार्यक्रमात दोन महिन्यात प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याअनुषंगाने राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या नगर विकास व गृह मंत्रालयाला प्रस्ताव सादर करण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यात १०.४१ किलोमीटरचा पहिला टप्पा प्रायव्हेट तत्त्वावर पूर्ण करण्याची परवानगी मागण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावरील पहिल्या टप्प्याचा खर्च राज्य शासन करणार आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी (ता. २) महापालिका मुख्यालयात महामेट्रोचे अधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली.

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महामेट्रोचे विकास नागुलकर, नगररचना विभागाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर, मिळकत विभागप्रमुख उपायुक्त मनोज घोडे- पाटील, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके आदी या वेळी उपस्थित होते. मेट्रो निओ प्रकल्प अमलात आणताना महापालिकेचादेखील वाटा आहे.

त्याअनुषंगाने महापालिकेकडून सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शविण्यात आली. महापालिका मुख्यालयात महामेट्रोसाठी कार्यालयदेखील उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली. द्वारका ते नाशिक रोड, तसेच द्वारका ते शालिमार व गंगापूर रोड या भागाचे नकाशे दाखविण्यात आले.

बस डेपोसाठी नवीन जागेचा शोध

चेहेडी येथे ट्रक टर्मिनस जागेत महापालिकेकडून सिटीलिंक बससेवेसाठी डेपो उभारण्यात आला आहे. महामेट्रोकडून शिर्डी येथील बस डेपोच्या जागेची मागणी करण्यात आली. महापालिकेने तत्काळ जागा देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे सिटीलिंक बस डेपोसाठी आता नवीन जागेचा शोध करावा लागणार आहे.

त्याचबरोबर गंगापूर रोड येथे मेट्रोचे एक स्टेशन राहणार असून तेथेच डेपोची निर्मितीदेखील केली जाणार आहे. तेथे देखील महामेट्रोकडून जागेची मागणी करण्यात आली. त्याअनुषंगाने आयुक्तांनी तातडीने जागेचे सर्वे नंबर सादर करण्याच्या सूचना भूसंपादन व मिळकत विभागाला दिल्या.

"मेट्रो निओ प्रकल्प संदर्भात मेट्रो रेल अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात प्रामुख्याने जागेसंदर्भात चर्चा करण्यात आली. चेहेडी व गंगापूर येथे महामेट्रोकडून जागेची मागणी करण्यात आली." - डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

MS Dhoni : MS धोनीमुळे हरली CSK? 'या' मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून

Nancy Tyagi: 30 दिवस, 1000 मीटर कापड अन् 20 किलो वजन; कान चित्रपट महोत्सवात परिधान केला स्वत: शिवलेला ड्रेस, नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT