ayushman bharat golden card news  esakal
नाशिक

Ayushman Bharat Scheme : आयुष्यमान भारत योजनेच्या E- Cardसाठी विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व ग्रामपंचायत विभागांमार्फत आयुष्यमान भारतचे ई-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढण्यासाठी १५ दिवस विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. या ई-कार्डच्या माध्यमातून १ हजार २०९ आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया होणार आहे.

आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थ्यांना पाच लाखांपर्यंत वैद्यकीय संरक्षण मिळते. या योजनेंतर्गत ई-कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेले आयुष्यमान भारतचे पत्र, रेशन कार्ड किंवा आधार कार्ड ही कागदपत्रे घेऊन जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय अथवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करावी.

त्याचप्रमाणे स्वतःचा मोबाईल क्रमांक जवळ ठेवून त्यावर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करतेवेळी देण्यात यावा, जेणे करून ई-कार्ड त्वरित तयार होऊन मोफत उपलब्ध होईल. जास्तीत जास्त नागरिकांनी मोफत ई-कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले.

जिल्ह्यात पाच लाख नागरिकांची नोंदणी

जिल्ह्यात २०११च्या सामाजिक, आर्थिक व जातीय सर्वेक्षणातून या योजनेसाठी १६ लाख ७ हजार १४४ लाभार्थी पात्र ठरले असून २३ सप्टेंबर, २०१८ पासून आजपर्यंत साधारण चार लाख ९० हजार लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारतचे ई-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढले आहे. त्यापैकी जिल्ह्यातील ३ लाख ७१ हजार ७२७ लाभार्थ्यांनी ही योजना सुरू झाल्यापासून लाभ घेतला आहे. त्यासाठी रुपये ७८६ कोटी १४ लाख २१ हजार ७०८ इतका खर्च करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: विराट कोहली ४ महिन्यानंतर मायदेशात परतला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियासोबतच रवाना होणार

'ट्रेंड्सपेक्षा कंफर्ट महत्त्वाचा!' अभिनेत्री रिया जोशीचा लाँग स्कर्ट, सिल्व्हर ज्वेलरी आणि साडीतील खास स्टाईल फंडा

Diwali Travel Pune: दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचंय? मग पुण्यातल्या 'या' सुंदर ठिकाणी जा आणि परदेशासारखा अनुभव घ्या!

सरन्यायाधीशांसमोर हजर करण्याचा बनाव, डिजिटल अरेस्ट करत नाशिकमध्ये २ वृद्धांची ७ कोटींची फसवणूक

गौतम गंभीरचे Rohit Sharma, विराट कोहली यांच्या भविष्याबाबत मोठं विधान! मोजक्या शब्दात बरंच काही बोलून गेला, चाहत्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT