voting sakal
नाशिक

Nashik News: मतदार नोंदणीसह यादीच्या शुद्धीकरणाची विशेष मोहीम; 25, 26 ला अधिकारी मतदान केंद्रावर

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे.

त्या अनुषंगाने ११४ मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघांतर्गत २५ व २६ नोव्हेंबरला विशेष मोहीम होणार आहे. या मतदारसंघातील नागरिकांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून यादीत आपल्या नावाची खात्री करावी.

हरकत असल्यास दुरुस्तीबाबत आवश्यक कागदपत्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकारींकडे सादर करावी, असे आवाहन प्रांताधिकारी नितीन सदगीर यांनी केले आहे. (Special Campaign for Purification of List with Voter Registration 25th 26th at Adhikari Polling Station Nashik News)

२५, २६ नोव्हेंबरबरोबरच २ व ३ डिसेंबरला मध्य विधानसभा मतदार संघाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे त्यांना नेमून दिलेल्या मतदार केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. तृतीयपंथी, महिला सेक्स वर्कर, भटक्या व विमुक्त जमाती या प्रकारच्या वंचित घटकातील मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी विशेष शिबिर होणार आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी या दोन्ही शिबिरांचा लाभ घ्यावा. नवीन मतदारांनी आपले नाव मतदारयादीत नोंदवावे. नागरिकांनी आपले नाव, छायाचित्र, पत्ता दुरुस्ती, मृत नागरिकांचे नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादी शुद्धीकरण करण्यास मदत करावी असे आवाहन श्री. सदगीर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT