Maharashtra chamber of commerce sakal
नाशिक

Nashik News : उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आज विशेष बैठक

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रिकल्चरतर्फे उत्तर महाराष्ट्राच्या समृद्ध व सर्वांगीण विकासाचे धोरण ठरविण्यासाठी शनिवारी(ता. ५) सायंकाळी सहाला हॉटेल एक्स्प्रेस इन येथे व्यापार, उद्योग, कृषिप्रक्रिया उद्योग क्षेत्रातील मान्यवर व सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक होणार आहे. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी अध्यक्षस्थानी राहतील. (Special meeting today for overall development of North Maharashtra nashik news)

उत्तर महाराष्ट्र विभागाच्या व्यापार, उद्योगाला प्रोत्साहन व चालना देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिअल ॲग्रिकल्चरतर्फे ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान आंतरराष्ट्रीय ‘मायटेक्स्पो- २०२३’ या ट्रेड फेअरचे आयोजन शहरातील डोंगरे वसतिगृह मैदान येथे होणार आहे.

‘मायटेक्सपो- २०२३’ ट्रेड फेअरच्या माहितीपत्रकाचे अनावरण पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

ट्रेड फेअरच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील व्यापार उद्योग, कृषिप्रक्रिया उद्योगाला राज्य व देश, जागतिक पातळीवर प्रोत्साहन देण्याचे काम होणार असून, या माध्यमातून नवीन व्यापार उद्योगांच्या संधी प्राप्त होणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या एक्स्पोमध्ये व्यापार, उद्योग, कृषी, उद्योग, बांधकाम, आयटी, शिक्षण ऑटोमोबाईल, गृहप्रकल्प, सोलार यांसह विविध पंधराहून अधिक क्षेत्रांतील तीनशे स्टॉल प्रदर्शनात असणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र होणार आहेत.

कार्यक्रम यशस्वितेसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उपाध्यक्ष कांतिलाल चोपडा, उपाध्यक्ष नितीन बंग, शाखा अध्यक्ष संजय सोनवणे, प्रदर्शनाचे कन्व्हेनर व्हिनस वाणी, को- कन्व्हेनर सचिन शहा, मिलिंद राजपूत, संदीप भंडारी यांच्यासह विविध समितीचे चेअरमन, को-चेअरमन, सदस्य व कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत.

महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, शिक्षण, ऑटोमोबाईल, कृषिप्रक्रिया उद्योग, गृहप्रकल्प, सोलर यांसह विविध क्षेत्रांतील व्यापारी उद्योजकांनी एक्स्पोमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT